Ambernath Leopard News Saam Tv
मुंबई/पुणे

Leopard : खराखुरा बिबट्या पकडला नाही, बदलापुरातील NCP पदाधिकारी संतापले; वनविभागालाच भेट दिला बिबट्या, पण...

Ambernath Leopard News : अंबरनाथ तालुक्यात बिबट्याची दहशत वाढत असून पाळीव जनावरांवर हल्ले सुरू आहेत. बिबट्या पकडण्यात वनविभाग अपयशी ठरल्याने राष्ट्रवादीने प्रतिकृती आणि पिंजरा भेट देत निषेध केला.

Alisha Khedekar

  • अंबरनाथ तालुक्यात २ आठवड्यांपासून बिबट्याचा धुमाकूळ.

  • कुत्रे, बकऱ्या आणि पाळीव जनावरांवर हल्ले; वनविभागाला पकडण्यात अपयश

  • राष्ट्रवादीकडून प्रतिकृती व पिंजरा भेट देत अनोखे आंदोलन

  • मानव–प्राणी संघर्ष टाळण्यासाठी कडक व तातडीच्या उपाययोजनांची मागणी

मयुरेश कडव,बदलापुर

राज्यात जिकडे तिकडे 'बिबट्या आला रे' च्या तुफान चर्चा आहेत. काही ठिकाणी बिबट्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. खेड्या पाड्यात फिरणाऱ्या बिबट्याने मुंबई शहराला देखील सोडलं नाही. अशातच गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ तालुक्यात बिबट्याची दहशत पाहायला मिळाली . या बिबट्याला पकडण्यात वनविभाग सपशेल अपयशी ठरल. याचाच निषेध म्हणून बदलापुरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अविनाश देशमुख यांनी चक्क वनाधिकाऱ्यांना बिबट्याची प्रतिकृतीच भेट दिली. बिबट्याला पकडण्याची शूरताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे राहिलेली नाही. आता माणसांचा जीव गेल्यानंतरच तुम्ही बिबट्याला पकडणार का? असा संतप्त सवालही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी विचारला आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून अंबरनाथ तालुक्यातील तीन झाडी, आंबेशीव काराव आणि वांगणी परिसरात बिबट्यानं धुमाकूळ घातला आहे. बिबट्यानं आतापर्यंत भटके कुत्रे, बकऱ्या आणि पाळीव जनावरांची शिकार केली. मात्र बिबट्याला पकडण्यात वन विभागाला अद्याप यश आलेलं नाही.

वनविभागाच्या नाकर्तेपणाविरोधात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी आक्रमक पवित्रा घेत चक्क बिबट्याची प्रतिकृती आणि पिंजरा आणत वन विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले. येत्या काही दिवसात वनविभाग बिबट्याला जेरबंद करू शकला नाही, तर अधिकाऱ्यांना उंदीर पकडण्याचे पिंजरे भेट देऊ असा इशाराही देशमुख यांनी दिला आहे.

तर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती बदलापूरच्या सहाय्यक वनसंरक्षक भाग्यश्री पोले यांनी दिली. आवश्यक त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील असही त्यांनी सांगितल आहे. अर्थात वनविभागाने उपाययोजनांचे कितीही दावे केले तरी, बिबट्याचे वाढते हल्ले लक्षात घेता, वनाधिकाऱ्यांच्या दाव्यांमधला फोलपणा उघड झाला आहे. त्यामुळे एखादी मोठी घटना घडण्यापूर्वीच वनविभागाने ठोस पावलं उचलण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्यातील शिंदे सेनेच्या नगरसेवकांची आज बैठक

Kidney cancer: ही ७ लक्षणं दिसली तर समजा किडनीचा कॅन्सर शरीरात करतोय घर; लगेच करून घ्या तपासणी

Namo Shetkari Yojana: ९४ लाख शेतकऱ्यांसाठी खुशखबर! १० दिवसात खात्यात जमा होणार ₹४०००

Silver Rate: बापरे! चांदीने ओलांडला ३ लाखांचा टप्पा! आज १ किलो चांदीसाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये

US Vs Iran: अमेरिका 48 तासात इराणवर करणार हल्ला? चीनची इराणला लष्करी मदत?

SCROLL FOR NEXT