Sanjay raut  saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut: संजय राऊत यांची अटक अवैध पद्धतीने; कोर्टाच्या ऑर्डर कॉपीमध्ये उल्लेख

प्रविण आणि संजय राऊत यांना अवैध पद्धतीने अटक करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांना कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी आज जामीन मंजूर मिळाला. मात्र पीएमएलए कोर्टाच्या ऑर्डर कॉपीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रविण आणि संजय राऊत यांना अवैध पद्धतीने अटक करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे ईडीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. (Maharashtra News)

PMLA कोर्टाने ई़डीने या प्रकरणात आपल्या मर्जीने आरोपी निवडले असून तसेच संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना बेकायदेशीरित्या अटक केली असल्याचे म्हटले आहे.

सेशन कोर्टाच्या ऑर्डरमधून कोर्टाने संजय राऊत यांच्या अटकेबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्य आरोपी राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि या घोटाळ्यातील सरकारी अधिकारी यांच्यावर कारवाई का झाली नाही, त्यांना अद्याप अटक झालेली नाही.

कोर्टाच्या ऑर्डर कॉपीनुसार, ईडीने संजय राऊत यांना अवैध पद्धतीने अटक केली आहे. संजय राऊत आणि प्रविण राऊत दोन्ही आरोपींविरोधात कोर्टासमोर सबळ पुरावे नाहीत. प्रविण राऊत आणि संजय राऊत यांनी कायदेशीर पद्धतीने असल्याचं पटवून देण्याच्या सूचना कोर्टाने केली आहे. या सर्व बाबींमुळे सेशन कोर्ट आणि हायकोर्टाने ईडीवर ताशेरे ओढले आहेत.

संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

तब्बल 100 दिवसांनंतर संजय राऊत बाहेर येणार आहेत. जामीन मंजूर जाल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास होता. मी न्यायदेवतेचे आभार मानते. मी पुन्हा लढेन, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी संजय राऊतांनी आत्मविश्वास व्यक्त केला होता.

संजय राऊत जेलमधून थेट जाणार लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यासमोरील हनुमान मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे. तिथून सिद्धिविनायक मंदिर, बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ येथे जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आजच रात्री ते उद्धव ठाकरेंच्याही भेटीला जाणार आहेत. संजय राऊतांच्या स्वागतासाठी आर्थर रोड जेल बाहेर पाच वाजता शिवसैनिकडून भव्य बाईक रैली काढण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमधील आदिवासी आंदोलकांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी घेतली भेट

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT