ajit pawar  saam tv
मुंबई/पुणे

मोदींनी घराणेशाहीवर केलेल्या टीकेला अजित पवारांनी दिले उत्तर, म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना देशासमोर घराणेशाही आणि भ्रष्टाचार ही दोन आव्हाने असल्याचे म्हटले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना देशासमोर घराणेशाही आणि भ्रष्टाचार ही दोन आव्हाने असल्याचे म्हटले. "घराणेशाही देशाला पोखरत आहे. मी फक्त राजकीय क्षेत्राबाबत बोलतोय असे लोकांना वाटते, राजकारणात घराणेशाहीमुळे देशाच्या प्रतिभेचे मोठे नुकसान होत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. पंतप्रधान मोदी यांच्या या वक्तव्याला विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घराणेशाहीच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, लोकशाही पद्धतीने भारतामध्ये सर्वांना निवडून येण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जरी घराणेशाहीतला व्यक्ती असला तरीसुद्धा त्याची कुवत आणि क्षमता असेलतर तो निवडून येत असेल तर त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखे काही नाही. पण कुवत आणि क्षमता नसेल आणि त्याला पदावर बसवले तर ते योग्य आहे का असा प्रश्न मला उपस्थित करायचा आहे, पण एखाद्याच्या घरात जन्मलेली पुढची पिढी कर्तृत्ववान असेल आणि लोकशाही पद्धतीने त्यांच्या भागातल्या लोकांनी आमदार, खासदार केलं तर त्याला घराणेशाही म्हणणं साफ चुकीचं आहे, असंही अजित पवार यांनी सांगितले.

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळचा विस्तार झाला, काल या मंत्र्यांचे खातेवाटपही झाले. यावरुन आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. खातेवाटपावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र राज्याचा कुठल्याही खात्याचा मंत्री होणे महत्त्वाची गोष्ट आहे, वजनदार खाती तुमच्या भाषेत असतात. माझ्यासाठी सर्व खाते समसमान आहेत, आणि जर एखाद्या माणसाची कुवत नसेल आणि त्याला जर मलाईदार खाते मिळाले तर ते खातच योग्य पद्धतीने चालणार नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

'जोपर्यंत १४५ चा बहुमताचा आकडा आहे, तोपर्यंत हे सरकार राहिल. आमचे सरकार असताना सांगितले जात होते की, २५ वर्षांचे हे सरकार राहील. कार्यकर्त्यांना खुष करण्यासाठी असे बोलावे लागते. पण कोणीही ताम्रपट घेऊन आलेले नाही हे लक्षात ठेवावे. बहुमता मधला एक आकडा जरी कमी झाला तरी सरकार कोसळू शकते, असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! पोटच्या ३ मुलींचा जीव घेतला, मग आपल्या आयुष्याचाही दोर कापला, आईने का उचललं टोकाचं पाऊल?

Dharashiv : गुरुजी, आमच्या शाळेतून जाऊ नका ना! म्हणत विद्यार्थ्यांनी हंबरडा फोडला | पाहा VIDEO

Pune Crime: मंदिरात घेऊन गेला, मंत्रोच्चार करत अघोरी विधी; अंगाऱ्याचा पेढा खायला दिला, नंतर महिलेसोबत...

Maharashtra Live News Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 सप्टेंबरला

Crime News : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची बीडमध्ये पुनरावृत्ती, विवाहानंतर दोन महिन्यांतच सासरकडून छळ, तरुणीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT