शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना हलवलं दुसऱ्या रुग्णालयात... Saam Tv
मुंबई/पुणे

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना हलवलं दुसऱ्या रुग्णालयात...

गोरेगाव येथील SVS रुग्णालयात आनंदराव अडसूळ यांना नेण्यात आल्याची माहिती आहे.

विहंग ठाकूर

विहंग ठाकूर

मुंबई: शिवसेनेचे Shivsena नेते आनंदराव अडसूळ Anandrao Adsul यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. लाईफ लाईन रुग्णालयातून Life Line Hospital Mumbai त्यांना SVS रुग्णालयात हलवले आहे. गोरेगाव येथील SVS रुग्णालयात आनंदराव अडसूळ यांना नेण्यात आल्याची माहिती आहे. सोबत कुटुंबीय आणि काही ED चे अधिकारी असल्याची माहिती आहे.

हे देखील पहा-

सिटी कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा City co operative bank scam प्रकरणात ईडीच्या ED च्या रडारवर आनंदराव अडसूळ आहेत. त्यांनी EDच्या विरोधात हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. ED कडून दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करत होणाऱ्या अटकेपासून दिलासा मिळण्यासाठी त्यांनी याचिका दाखल केली आहे. त्यांच्यावर City co operative bank मध्ये 980 कोटींचा घोटाळा केळ्याचा आरोप आहे.

दरम्यान, ता. 27 सप्टेंबर रोजी, अडसुळांची ED कडून तीन चार तास चौकशी झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं होत. त्यावेळेस अचानक त्यांची तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावर आज अडसुळ यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे अशी माहिती होती. मात्र ईडीचे अधिकारी ED Officers तिथंच त्यांना ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत. या प्रकरणी न्यायालयाकडे दुपारी तातडीची सुनावणी घेण्याबाबत याचिका दाखल केली आहे.

ते आजारपणाचे नाटक करत आहेत;

शिवसेनेचे  माजी खासदार  आनंदराव  अडसूळ  यांना रुग्णालयात  दाखल  करण्यात  आलय . ते आजारपणाचे नाटक करताहेत. आमदार रवी  राणा  यांचा  आरोप केलाय. त्यांना संपत्ती जप्त होऊन  ईडीकडून अटक होईलच असेही रवी राणा म्हणले आहेत.

अडसूळ यांच्यावर काय आहेत आरोप ?

'सीटी बँकेमध्ये कामगार, पेंशनधारक, 99 टक्के मराठी लोकांचे खाते होते. त्यामुळे जवळपास 9 हजार खातेधारक Account Holder होते. त्या बँकेतील खातेदारांचे पैसे अवैधरित्या बिल्डरांना वाटण्यात आले आणि त्यात अडसूळांनी 20 टक्के कमिशन घेतले यामुळे बँक पूर्ण बुडाली. यामध्ये जवळपास 980 कोटींचा घोटाळा झाला. दोन वर्षांपूर्वी एफआयआर FIR झाले आहे. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा Shivsena CM असल्यामुळे ही चौकशी केली नव्हती', असा आरोप आमदार रवी राणा Ravi Rana यांनी केला आहे.

मात्र, कुठल्याही प्रकारची अटक आनंदराव अडसूळ यांना झालेली नाही. ही रवी राणा यांनी पेरलेली माहिती आहे, असेआनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ Abhijit Adsul यांनी म्हटलं आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : महिलांना गरोदर करा आणि १० लाख कमवा, प्रेग्नंट जॉब सर्विसच्या नावाखाली मोठा घोटाळा; नेमकं प्रकरण काय?

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याने उच्चांक गाठला, १० तोळ्यामागे ११,५०० रुपयांची वाढ, वाचा आजचे भाव

Prabhas : बाईsss काय हा प्रकार! प्रभासच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये लावली आग, प्रेक्षकांमध्ये उडला गोंधळ, पाहा व्हायरल VIDEO

Maharashtra Live News Update : कांजुरमार्ग पूर्व येथील इमारतीला आग

White Butter Recipe : घरच्या घरी शुद्ध आणि चविष्ट लोणी कसे बनवावे? जाणून घ्या स्टेप्स

SCROLL FOR NEXT