laxmikant berde brother Marathi Actor ravindra berde passed away in Mumbai Saam TV
मुंबई/पुणे

Ravindra Berde Death: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं मुंबईत निधन; वयाच्या ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Ravindra Berde Passed Away: ज्येष्ठ मराठी अभिनेते रविंद्र बेर्डे यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला आहे.

Satish Daud

Ravindra Berde Passed Away

मराठी चित्रपट सृष्टीवर आघात करणारी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेते रविंद्र बेर्डे यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही काळापासून रविंद्र बेर्डे घशाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्यांवर मुंबईतील टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांना घरी आणण्यात आलं होतं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र, बुधवारी पहाटे त्यांना अचानक हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.रवींद्र बेर्डे हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू होते. दोघांनीही बऱ्याच सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.

रविंद्र बेर्डे यांनी आपल्या अभिनयाने मराठी सिनेसृष्टीत वेगळीच ओळख निर्माण केली होती. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा चित्रपटात अभिनय केला होता. त्यांनी चंगू मंगू, एक गाडी बाकी अनाडी, हाच सुनबाईचा भाऊ, खतरनाक,हमाल दे धमाल, थरथराट, उचला रे उचला, यांसारख्या अनेक मराठी चित्रपटात काम केले.

याशिवाय बेर्डे यांनी हिंदी चित्रपटात देखील अभिनय केला होता. अशा दिग्गज कलाकाराचं अचानक निधन झाल्याने सिनेसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे. रवींद्र बेर्डे यांना १९९५ मध्ये 'व्यक्ती आणि वल्ली' या नाटकादरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर २०११ पासून ते कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी तोंड देत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT