Pune News: मित्रांसोबत पर्यटनासाठी गेला अन् जीव गमावून बसला; १२०० फूट खोल दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू

Pune Mulshi News: प्लस व्हॅली परिसरात मित्रासोबत पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणाचा अंदाजे १२०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाला आहे.
Pune Mulshi News
Pune Mulshi NewsSaam TV
Published On

Pune Mulshi News

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ताम्हिणी मधील प्लस व्हॅली परिसरात मित्रासोबत पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणाचा अंदाजे १२०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. रोहन विरेश लोणी (वय २१ वर्ष) असं मृत तरुणाचं नाव आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Mulshi News
Maharashtra Politics: लोकसभेसाठी शिंदे गटाचा प्लान ठरला, धनुष्यबाण सोडून 'या' चिन्हावर निवडणूक लढणार?

रोहन हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या तो पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यास होता. मंगळवारी रोहन आपल्या ५ मित्रांसोबत मुळशी तालुक्यातील प्लस व्हॅली याठिकाणी पर्यटनासाठी आला होता. यावेळी रोहन अंघोळ करण्यासाठी एका कुंडात उतरला.

मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच पोहता येत नसल्याने तो कुंडात बुडू लागला. इतर मित्रांनी रोहनला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांसह लोणावळा शिवदुर्ग टीम, मुळशी आपत्ती व्यवस्थापनच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली.

बाराशे फूट खोल दरीतील कुंडात उतरून रोहनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा कुंडात पडून मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मुळशी तालुका हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. दररोज हजारो पर्यटक याठिकाणी येत असतात.

उंच ठिकाणी उभे राहून सेल्फी काढणे, कुंडात पोहण्यासाठी उतरणे, तसेच स्टंड देखील करतात. अशा कृत्यांमुळे जीव जाण्याचा धोका असतो. त्यामुळे याठिकाणी येताना पर्यटकांनी हुल्लडबाजी करू नये, असे आवाहन पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी केले आहे.

Pune Mulshi News
Maharashtra Rain News: राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट; 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com