बदलापुरात राष्ट्रवादीचे जोडेमारो आंदोलन SaamTvNews
मुंबई/पुणे

बदलापुरात राष्ट्रवादीचे जोडेमारो आंदोलन

ऍड.गुणरत्न सदावर्ते, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि किरीट सोमय्या यांच्या फोटोला मारले जोडे!

अजय दुधाणे

बदलापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर बदलापुरात आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोडेमारो आंदोलन केले. एसटी कामगारांना चिथावणी देणाऱ्या ऍड.गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte), भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि किरीट सोमय्या यांच्या फोटोला जोडे मारून निषेध करण्यात आला.

हे देखील पहा :

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी काल संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी धडक दिली. यावेळी पवारांच्या घरावर काही आंदोलकांनी दगडफेक आणि चप्पलफेक केली. या कर्मचाऱ्यांना वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी चिथावल्याचा राष्ट्रवादीचा (NCP) आरोप आहे. याचा निषेध करण्यासाठी बदलापुरात (Badlapur) राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जोडेमारो आंदोलन करण्यात आले.

वकील गुणरत्न सदावर्ते, भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) यांच्या फोटोला यावेळी जोडे मारण्यात आले. यावेळी पोलिसांनी या नेत्यांचे फोटो असलेला बॅनर जप्त करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी कुणाच्याही चिथावणीखोर वक्तव्याला भुलू नका, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे (Thane) जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी केलं.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Symptoms On Skin: चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स दिसतायेत? असू शकतं लिव्हर बिघडल्याच लक्षण, वेळीच व्हा सावध

Rashmika-Vijay Wedding: तारीख ठरली! रश्मिका आणि विजयच्या लग्नाचा बार उडणार; उदयपूरमध्ये होणार शाही विवाह

Vande Bharat Express : ४ नव्या वंदे भारत धावणार, कोणता आहे मार्ग? पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

Leopard Terror in AhilyaNagar: जुन्नरनंतर आहिल्यानगरमध्ये बिबट्याची दहशत; बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षांच्या बालिकेचा मृत्यू

Maharashtra Live News Update: खगोलशास्त्रातील आणखी एक तारा हरपला

SCROLL FOR NEXT