Barvi dam water cut postponed relief for citizens in Maharashtra saam tv
मुंबई/पुणे

बारवी धरणाच्या पाणी कपातीला तात्पुरती स्थगिती; नागरिकांना दिलासा

Barvi dam water cut postponed: ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली असून, बारवी धरणातून होणाऱ्या नियोजित पाणी कपातीला प्रशासनाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.

Saam Tv

संघर्ष गांगुर्डे

ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील लाखो नागरिकांना तूर्तास मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) बारवी धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी नियोजित केलेला शटडाऊन रद्द केला आहे. मात्र, ही पाणी कपात कायमस्वरूपी रद्द झालेली नसून, 3 डिसेंबरपासून दर गुरुवारी सलग 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीसह परिसरातील नागरिकांना पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

काय आहे एमआयडीसीचा निर्णय?

बारवी धरणातील उपलब्ध पाणीसाठा 31 ऑगस्ट 2027 पर्यंत पुरवण्यासाठी एमआयडीसीने पाणीपुरवठ्यात 10 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याच निर्णयानुसार सुरुवातीला 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, काही प्रशासकीय कारणांमुळे हा शटडाऊन तूर्तास रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातील नियोजित पाणी कपातीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

3 डिसेंबरपासून दर गुरुवारी पाणीबाणी

एमआयडीसीच्या नव्या वेळापत्रकानुसार, पहिला शटडाऊन 3 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून सुरू होऊन 4 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत असेल. म्हणजेच सलग 24 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. यानंतर दर आठवड्याला गुरुवारच्या मध्यरात्रीपासून शुक्रवारच्या मध्यरात्रीपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल.

या भागांना बसणार पाणी कपातीचा फटका

या निर्णयाचा परिणाम कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर यांसह संबंधित महापालिका क्षेत्रे, ग्रामपंचायती आणि औद्योगिक वसाहतींमधील नागरिकांवर होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणीपुरवठा बंद होण्यापूर्वी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

बारवी धरणातील पाणीसाठा दीर्घकाळ टिकवण्यासाठी ही कपात आवश्यक असल्याचे एमआयडीसीने स्पष्ट केले आहे. नागरिक, उद्योजक, महापालिका आणि ग्रामपंचायतींनी पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भीमाशंकरची महादेव नगरी सजली

मृत्यू झालेल्या व्यक्तीचे कपडे का परिधान करू नये? घरात पडलेल्या कपड्याचं काय करावं?

Crime News : यूट्यूबवर व्हिडिओ पाहिला अन् थेट 3 घरं फोडली! चोराची आयडिया ऐकून पोलीसही चक्रावले

28 षटकार, 7 चौकार, बेबी बॉसचं अवघ्या 52 चेंडूत द्विशतक; रोहित, गिलला जे जमलं नाही ते वैभवनं केलं!

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार? अजय बारस्कररांनी पोलिसांना सोपवला जरांगेंच्या विरोधातील पुराव्याचा पेनड्राईव्ह

SCROLL FOR NEXT