Larvae Found In Student Milk Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: विद्यार्थ्यांच्या पोषण आहारातील दुधात आढळल्या जिवंत अळ्या; आंबेगावच्या आश्रम शाळेतील धक्कादायक घटना, VIDEO व्हायरल

Larvae Found In Student Milk At Ashram School In Ambegaon: आंबेगावमध्ये विद्यार्थ्यांच्या दुधामध्ये जिवंत अळ्या आढळल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Rohini Gudaghe

मुंबई : पुण्या्च्या आंबेगाव येथील आदिवासी निवासी इंग्रजी शाळेमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांच्या पोषण आहारामध्ये चक्क जिवंत अळ्या सापडल्याची घटना घडलेली आहे. विद्यार्थ्यांना सकाळी नाश्त्यामध्ये दूध देण्यात येतं. या दुधामध्ये जिवंत अळ्या सापडलेल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती, तर संबंधित प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात (Pune News) आहे.

आश्रम शाळेतील धक्कादायक घटना

आंबेगावच्या आदिवासी आश्रम शाळेतील ही धक्कादायक घटना आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये जिवंत अळ्या आढळल्या होत्या. त्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या दुधामध्ये जिवंत अळ्या सापडल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. या आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचं समोर आलंय. मुलांच्या जिवाशी खेळ सुरू असल्यानं आता संताप व्यक्त केला जात (Larvae Found In Student Milk) आहे.

दुधामध्ये आढळल्या जिवंत अळ्या

विद्यार्थ्यांना जे दूध वितरण केलं जातं, त्यात अळ्या सापडल्या आहेत. प्रकल्पाअंतर्गत जितक्या आश्रमशाळा येतात, त्या सर्व शाळांना हे दूध वितरीत केलं जातं.येत्या सहा तारखेला पुण्यात होणाऱ्या आंदोलनात हा मु्द्दा मांडला जाणार असल्याची माहिती मिळत (Ashram School In Ambegaon) आहे. दुधाच्या जुन्या पाकिटांमध्ये अळ्या होत्या, नवीन पाकिटं उघडून पाहिलं असता त्यात देखील अळ्या आढळल्या, अशी माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही पाकिटं पुणे आणि नाशिकच्या वरिष्ठ कार्यालयांमध्ये पाठवण्यात येणार आहे. याप्रकरणी सखोल चौकशी केली जाणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

व्हिडिओ व्हायरल

दुधात अळ्या सापडल्याचा व्हिडिओ (Video Viral) व्हायरल झालाय. व्हिडिओमध्ये आपण पाहु शकतो, की दुधात अळ्या तरंगताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात आतापर्यंत अनेक प्रकारचे प्राणी आढळले होते. कधी बेडूक तर कधी साप तर आता चक्क दुधात अळ्या सापडल्या आहेत. असे अन्न जर विद्यार्थ्यांनी खाल्लं, तर निश्चितच त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचणार आहेत. विद्यार्थ्यांना त्रास झाल्यास जबाबदार कोण असणार, हा सवाल निर्माण होत आहे. जे कोण हे दूध पुरवतं, ज्यांनी कोणी कॉन्ट्रक्ट दिलं गेलंय, त्यांची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT