Navi Mumbai International Airport Renaming Protest Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Airport: नामांतरासाठी भुमिपुत्र काम बंद पाडणार! पाच हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

Navi Mumbai Airport: नुकत्याच झालेल्या भूमिपुत्र निर्धार परिषदेत दिबांचे नाव लागल्याशिवाय विमान उडणार नाही, आणि त्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल असा एल्गार पुकारण्यात आला.

विकास मिरगणे

नवी मुंबई: नवी मुंबई Navi Mumbai विमानतळाच्या Airport नामांतराचा मुद्दा सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. या विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांच (D. B. Patil) नाव देण्यासाठी ठाणे, रायगड जिल्ह्यातील भूमीपुत्रांच्या संघटना एकवटल्या आहेत. थोड्याच वेळात याठिकाणी काम बंद आंदोलन होणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुमारे 5 हजार पोलीस तैनात केले आहेत. पनवेल शहरातील महात्मा फुले सभागृह (आगरी समाज हॉल) येथे कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष राम ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थित बैठक पार पडली. त्यावेळी हा निर्णय जाहीर करत यशस्वी होईपर्यंत आंदोलने करीत राहणार असल्याची घोषणा करण्यात आली. (land sons will stop work of Navi Mumbai Airport for the renaming Five thousand police force deployed)

हे देखील पहा -

नवी मुंबई विमानतळाला (Navi Mumbai International Airport) स्व. लोकनेते दि. बा.पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्यात यावे यासाठी आगरी, कोळी, कुणबी, कराडी तसेच स्थानिक भूमीपुत्र आग्रही आहेत. यासाठी 10 जून 2021 ला मानवी साखळी आंदोलन केले. यानंतर 14 जून 2021 ला सिडकोला घेराव आंदोलन करण्यात आले. त्यानंतर साधारण 350 गावात मशाल मोर्चा काढण्यात आला होता.

नवी मुंबई विमानतळासाठी स्थानिक भूमिपुत्रांच्या जागा या आरक्षित केल्या गेल्या होत्या भूमिपुत्रांनी देखील आपल्या जागा नवी मुंबई विमानतळासाठी दिल्या. असं असताना भूमिपुत्रांची मागणी होती की "आमच्या नेत्याचे नाव या विमानतळाला असावं" मात्र असे न होता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याच्या प्रस्तावावर सिडको संचालक मंडळाने शिक्कामोर्तब करुन सदर प्रस्ताव शिफारशीसह राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठवला. त्यामुळे आता या नामांतराचा वाद पेटायला सुरवात झाली.

पनवेल तालुक्यात होऊ घातलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी सन २००८ पासून सिडकोकडे सातत्याने विविध संघटना, संस्था व प्रकल्पग्रस्तांची सातत्याने मागणी आहे. १३ जानेवारी २०२२ रोजी भूमिपुत्र निर्धार परिषद अशी लक्षवेधी ऐतिहासिक आंदोलने झाली. दुसरीकडे सिडकोने या सार्वत्रिक मागणीकडे दुर्लक्ष करीत याविषयी गुपचूप केलेला ठराव विखंडित करण्याचा निर्णय आजवर घेतलेला नाही.

या पार्श्वभूमीवर १३ जानेवारी रोजी झालेल्या भूमिपुत्र निर्धार परिषदेत विमानतळ बाधित २७ गावांच्या प्रलंबित समस्या सोडवण्या विषयी सिडकोस अल्टिमेटमही देण्यात आला होता. याकरिता पोलीस अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने २० जानेवारीला सिडको प्रशासनाबरोबर २७ गाव विमानतळ बाधित प्रतिनिधी आणि विमानतळ नामकरण कृती समिती प्रतिनिधी यांची सिडको भवनात बैठक घेण्यात होती. त्यामुळे आता हा नामांतराचा वाद आणखी किती चिघळणार हे पहावं लागेल.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: काहींना कामात यश मिळेल तर काहींना प्रवास जपून करावा लागेल, पाहा साप्ताहिक राशीभविष्य

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

SCROLL FOR NEXT