Land Mafia Builds Tower on Ambedkar Familys Plot Saam Tv
मुंबई/पुणे

Dombivli News: भूमाफियांचा प्रताप! बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांच्या जमिनीवर उभारली इमारत, पालिका चालवणार हातोडा

Land Mafia Builds Tower on Ambedkar Familys Plot: डोंबिवलीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या नावावर असलेल्या भूखंडावर अतिक्रमण करत इमारत उभारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आता पालिका कारवाई करत या इमारतीवर हातोडा चालवणार आहे.

Priya More

अभिजित देशमुख, कल्याण

कल्याण -डोंबिवली महापालिका क्षेत्रात भूमाफियांनी केडीएमसीच्या आरक्षणाच्या जमिनीवर भल्या मोठ्या टोलेजंग इमारती बांधण्यात आल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. डोंबिवलीजवळील दावडी परिसरात तर भूमाफियांनी चक्क राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या नावावर असलेल्या भूखंडावर अतिक्रमण करत टोलेजंग इमारत उभारली आहे.

विशेष म्हणजे 2023 साली तळ अधिक एक मजल्याचे बांधकाम झाल्यापासून याप्रकरणी तक्रार केल्यानंतरही प्रशासनाने याकडे केवळ नोटीसा देत दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय. 2023 साली अनधिकृत घोषित केलेल्या या इमारतीवर 20 मे रोजी कारवाई केली जाणार आहे. संबंधित विकासकावर देखील एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय . दरम्यान या बांधकामा विरोधात पालिका प्रशासनाने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार देत कारवाईसाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे.

डोंबिवलीजवळील कल्याण शीळ मार्गालगत दावडी येथील सेंट जॉन शाळेसमोरी भागात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातेवाईकांच्या नावावर असलेल्या भूखंडावर भूमाफियांनी सात मजली इमारत उभी केली आहे. या जमिनीच्या 7/12 वर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांच्यासह आणखी दोन जणांची नावं आहेत. दरम्यान आपल्या भूखंडावर अतिक्रमण होत असल्याचे लक्षात येताच आनंदराज आंबेडकर यांनी संबधित भूमाफियाला जाब विचारत याची माहिती रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्याना देत याप्रकरणी मदत करण्याची मागणी केली होती.

यानंतर रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आनंद नवसागरे यांनी याप्रकरणी पालिका प्रशासनाकडे तक्रार करत हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची मागणी केली होती. मागील अडीच वर्षापासून नवसागरे याप्रकरणी पाठपुरावा केला होता या दरम्यान एका विकासकाने अर्धवट काम सोडले होते यानंतर दुसऱ्या विकासकाच्या मदतीने संबधित भूमाफियाने अर्धवट राहिलेल्या इमारतीचे काम पूर्ण केले असून 8 मजली इमारत उभी करण्यात आली आहे.

दरम्यान याप्रकरणी महसूल विभागासह पालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता पालिका प्रशासनाच्या वतीने आय प्रभागाचे अधीक्षक नितीन चौधरी यांनी विकासक ललित महाजन यांच्यासह भूमाफिया विरोधात मानपाडा पोलिसात तक्रार दाखल केली असून संबधित प्रकरणी पोलिसांनी एम आर टीपी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी या अनधिकृत इमारतीवर 20 मे रोजी तोडक कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्त मिळण्याची मागणी पोलीस उपायुक्ताकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापालिका निवडणुकांची तयारी सुरू, राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश, बिगूल कधी वाजणार? VIDEO

Waterfalls near Neral: गर्दी कमी आणि लांब जाण्याचीही गरज नाही! नेरळ-माथेरान जवळ आहेत 'हे' लपलेले धबधबे

Pune Shivneri Bus : दारु पिऊन शिवनेरी चालवत होता, प्रवाशांनी दारुड्या चालकाला रंगेहाथ पकडले अन् पुढे...

Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा धक्का; धाराशिवातील बड्या नेत्याकडून पदाचा राजीनामा

Gaganbawda Tourism: कोल्हापूरपासून अगदी हाकेच्या अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण, या विकेंडला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT