Lalit patil news  Saam TV
मुंबई/पुणे

CCTV Footage : ललित पाटीलचा आणखी एक कारनामा, जेलमधून रुग्णालयात कसा पोहोचला? VIDEO आला समोर

Lalit Patil News Update : ललित पाटीलला २०१९ मध्ये अटक झाल्यानंतर तो येरवाडा तुरुंगात शिक्षा भोगत होता.

प्रविण वाकचौरे

Pune News :

ड्रग माफिया ललित पाटील याच्या अटकेनंतर अनेक गोष्टी हळूहळू समोर येऊ लागल्या आहे. ललित पाटीलसोबत या प्रकरणात अनेक जणांचा समावेश असण्याची शक्यत आहे. आतापर्यंत १५ हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.

ललित पाटीलला २०१९ मध्ये अटक झाल्यानंतर तो येरवाडा तुरुंगात शिक्षा भोगत होता. मात्र तेथून तो रुग्णालयात कसा पोहोचला याबाबतचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ललित पाटील आजारपणाचा नाटक करत असतानाचा व्हिडीओ आता समोर आला आहे. सध्या समोर आलेला व्हिडीओ २०२० मधला आहे. ललित पाटीलला ड्रग्स तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला हिंजवडी पोलिस ठाण्यात आणलं होतं.

हिंजवडी पोलीस ठाण्यात आणल्यानंतर ललितने आजारपणाचं नाटक केलं होतं. पोलीस स्टेशनच्या जिन्यावरून उतरताना पडण्याचं नाटक ललितने केलं होतं, हे आता निष्पन्न होत आहे.

ललितच्या पायाला पट्टी बांधलेली दिसत आहे. जिन्यावरुन उतरताना ललित पडताना दिसत आहे. यावेळी त्याला दुखापत झाल्याचं त्याने भासवलं आणि याच सीसीटीव्हीच्या आधारे दुसऱ्याच दिवशी त्याला औंध रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ललित पाटीलची आज कोठडी संपणार?

ललित पाटील याची आज कोठडी संपत आहे. त्यामुळे त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे. यावेळी पोलीस त्याची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे. कारण ललितच्या ड्रग्सच्या व्यवसायाची व्याप्ती मोठी आहे. हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पोलीस त्याची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT