Lalbaugcha Raja Visrajan x
मुंबई/पुणे

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाचं विसर्जन कधी होणार? मंडळाने वेळ सांगितली

Lalbaugcha Raja Visrajan : गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा विसर्जनासाठी सज्ज झाला आहे. भरतीमुळे राजाच्या मूर्तीचे विसर्जन लांबणीवर पडले आहे. ग्रहणकाळात राजाचे विसर्जन होणार आहे.

Yash Shirke

  • भरतीमुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब झाला आहे.

  • मंडळाने रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास विसर्जन होईल असं सांगितलं.

  • भक्तगण उत्सुकतेने विसर्जनाची प्रतीक्षा करत आहेत.

लालबागचा राजा हा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर सकाळी पोहोचला आहे. भरतीमुळे त्याच्या विसर्जनला विलंब होत आहे. लालबागच्या राजाच्या मूर्तीचे विसर्जन समुद्राच्या भरतीमुळे लांबणीवर पडले आहे. लालबागच्या राजाचे विसर्जन कधी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भक्तगण विसर्जनासाठी गणरायाकडे प्रार्थना करत आहेत. रात्री साडेदहा ते अकरा या दरम्यान ग्रहणकाळात लालबागच्या राजाचे विसर्जन होणार असल्याचे म्हटले जात आहे.

काल (६ सप्टेंबर) विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीच्या दिशेने निघालेल्या लालबागच्या राजाच्या मूर्तीचे विसर्जन रखडले गेले आहे. समुद्राला भरती आल्यानंतर विसर्जन थांबवण्याचा निर्णय लालबागचा राजा मंडळाने घेतल्याची माहिती समोर आली आहे. विसर्जन कधी होईल याबाबतची माहिती मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी माध्यमांना दिली.

लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब झाल्याने सुधीर साळवी यांनी दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले, 'अनेक वर्ष कोळी बांधव आमच्यासोबत विसर्जनात सहभागी होतात. बधवार पार्कमधली कोळी बांधवांसोबत आम्ही संवाद साधला. त्याचं मत आहे की, साडेदहा ते अकराच्या सुमारास तराफा समुद्रात जाईल आणि तेव्हा लालबागचा राजाचं विसर्जनासाठी मार्गिक्रमण करेल. दोन दिवस मुंबईत तुफान पाऊस पडतोय. त्यामुळे भरती लवकर आली. आमची विसर्जन मिरवणूकची आणि भरतीची वेळ जुळली नाही. त्यानंतर विसर्जन थांबवण्याचा आम्ही (लालबागचा राजा मंडळ) निर्णय घेतला आहे.'

'आम्हा कार्यकर्त्यांसाठी हा क्षण वेगळा आहे. आम्ही नियोजन केल आणि तसं झालं नाही, असे याआधी झालं नाहीये. लालबागचा राजा हे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचं विसर्जन थोडं उशिरा का होईना, पण योग्य पद्धतीने, शास्त्रोक्त पद्धतीने वर्षोनुवर्ष करत आलेलो आहोत, तसंच आता थोड्या वेळात पूर्ण होईल', असेही सुधीर साळवी यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kojagiri Purnima 2025: कोजागिरी पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या योग्य पूजा पद्धत आणि महत्व

GK : मध खरंच कधीच खराब होत नाही का? जाणून घ्या

Cyber Fraud : सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात पोलीसच अडकला, लिंकवर क्लिक केलं अन्....

Twinkle Khanna: ऋषी कपूरविषयी ट्विंकल खन्नाचा धक्कादायक खुलासा; म्हणाली “मी तुझी नणंद…” हे ऐकताच आलिया भट्टला बसला धक्का

Maharashtra Live News Update : रामदास कदम यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करणार- अनिल परब

SCROLL FOR NEXT