Lalbaugcha Raja Ganpati Mandal Controversry Saam Tv
मुंबई/पुणे

Lalbaugcha Raja 2024 : सामान्यांना धक्काबुक्की, VIP ना पायघड्या; लागबाग राजाच्या दरबारात भक्तांमध्ये भेदभाव; पाहा VIDEO

Lalbaugcha Raja Ganpati Mandal Viral Videos: लालबाग परळमधील गणेशोत्सवाचं केंद्रस्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या चरणी कर्मचाऱ्यांची मुजोरी आणि भक्तांमधील भेदभाव समोर आलाय. हा भेदभाव नेमका कसा आहे? पाहा व्हिडिओ

Satish Kengar

भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

एकीकडे सर्वसामान्यांच्या बखोटे पकडून भाविकांना धक्के देत सुरक्षारक्षकांची सर्रास मुजोरी सुरुय. तर दुसऱ्या बाजूला धनदांडग्यांसाठी लालबागच्या राजा गणेश मंडळाकडून पायघड्या घातल्या जात आहेत. याचाच व्हिडिओ ही आता समोर आला आहे. व्हिडिओत तुम्ही राजाच्या दरबारातला भक्तांमधला भेदभाव उघडपणे सुरू असल्याचं पाहू शकता. त्यामुळे आता सामान्य भाविकांमध्ये संतापाची लाट उसळलीय.

लालबागच्या राजा मंडळाच्या सुरक्षा रक्षकांच्या मुजोरीचा वाईट अनुभव सर्वसामान्यांनाच नाही तर सेलिब्रेटींनाही येतोय. लालबागच्या राजा पंडालच्या बाऊन्सर्सने आपल्या आईला धक्काबुक्की केल्याचा आरोप पंड्या स्टोअर्स फेम अभिनेत्री सिमरणने केलाय. त्याचा व्हिडीओच सिमरणने इंस्टाग्रामवर पोस्ट केलाय.

लालबागच्या राजाच्या दरबारातल्या या मुजोरीवर साम टीव्हीनं काही सवाल उपस्थित केले आहेत.

  • राजाच्या दरबारातील मुजोरीवर 'साम'चे सवाल

  • रांग वाढत असताना VIP ना फोटो काढण्याची मुभा कशासाठी?

  • VIP ना पायघड्या तर सामान्य भक्तांना धक्काबुक्की कशासाठी?

  • कार्यकर्ते आणि कर्मचाऱ्यांच्या मुजोरीला मंडळ चाप का लावत नाही?

लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी राज्य आणि देशभरातून लाखो भाविक येत असतात. हे भाविक आठ ते दहा तास रांगेत थांबतात. मात्र या भाविकांना पंडालच्या बाऊन्सर्स आणि सुरक्षारक्षकांच्या मुजोरीचा सामना करावा लागतो.

त्यामुळेच बाप्पा तुझ्या देवळात मुजोरांचा फड असंच म्हणायची वेळ भाविकांवर आलीय. त्यामुळे लालबागचा राजा गणेश मंडळाने बाऊन्सर्सची मुजोरी थांबवायला हवी. कारण ही मुजोरी खुद्द बाप्पालाही आवडणारी नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

SCROLL FOR NEXT