Lalbaugcha Raja 2024 
मुंबई/पुणे

Lalbaugcha Raja Live : लालबागच्या राजाचे घरबसल्या लाइव्ह दर्शन, आरतीची वेळ आणि सर्व डिटेल्स एका क्लिकवर

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाचं २४ तास दर्शन युट्यूब, फेसबूकच्या माध्यमातून घेऊ शकता.

Namdeo Kumbhar

Lalbaugcha Raja 2024 : लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमानासाठी सर्वजण आतुर झाले आहेत. शनिवारी गणरायाचे वाजतगाजत आगमन होईल. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी वर्षभर गणेशभक्त वाट पाहत असतात. पुढील १० दिवस हा सण मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. मुंबई-पुण्यातील सार्वजनिक गणपतीचं दर्शन घेण्यासाठी सर्वजण येत असतात. नवसाला पावणारा अशी ओळख असलेला लालबागचा राजा. (Lalbaugcha Raja 2024) या राजाच्या दर्शनासाठी भलीमोठी रांग असते.

लोअर परेल, करी रोड, चिंचपोकळी, लालबाग, परेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे अनेकांचे हाल होतात. पण आता घरबसल्या लालबागच्या राजाचे दर्शन करता येणार आहे. लालबागचा राजा मंडळाने तशी व्यवस्था केली आहे. युट्यूब, फेसबूकच्या माध्यमातून लालबागच्या राजाचं २४ तास दर्शन घेऊ शकता. इतकेच काय तर गणपतीच्या आरतीवेळी तुम्ही ऑनलाईन सहभागी होऊ शकता.

लालबागच्या राजाची आरती कधी ?

लालबागच्या राजाची दिवसातून दोन वेळा आरती केली जाते. दररोज दुपारी १२.३० वाजता आणि रात्री ८ ते ९ दरम्यान लालबागच्या राजाची आरती केली जाते. आरतीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पण तुम्ही आता घरबसल्या आरतीमध्ये सहभागी होऊ शकता.

ज्यांना लालबागचा राजा थेट पहायचा आहे त्यांच्यासाठी खालील प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत:

अधिकृत वेबसाइट: https://lalbaugcharaja.com/en/

YouTube चॅनल: https://www.youtube.com/user/LalbaugRaja

फेसबुक पेज: https://m.facebook.com/LalbaugchaRaja

इंस्टाग्राम खाते: https://instagram.com/lalbaugcharaja

एक्स (ट्वीटर) खाते: https://twitter.com/lalbaugcharaja

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कन्नड नगर परिषदेची दुमजली इमारत कोसळली

Leftover Rice: शिळा भात खाल्ल्यास आरोग्यावर कोणते परिणाम होतात?

Late Night Awake: तुम्हालाही रात्री उशिरा पर्यंत जाग राहण्याची सवय आहे? वेळीचं व्हा सावधान नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Dhule Crime : वाढदिवसाच्या निमित्ताने बोलावत मित्राचा घातपात; कन्नड घाटात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, नातेवाईक संतप्त

Mumbai Local: लोकलमधून प्रवासी पडला अन्...; हार्बरची सेवा विस्कळीत|VIDEO

SCROLL FOR NEXT