लालबागचा राजाच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी File Photo
मुंबई/पुणे

लालबागचा राजाच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी

लालबागचा राजाचा गणेशोत्सव यंदा साजरा करणार, असल्याची घोषणा लालबागचा राजा मंडळाने केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : लालबागचा राजाच्या लाखो भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईचा लाडका लालबागचा राजाचा गणेशोत्सव यंदा साजरा करणार, असल्याची घोषणा लालबागचा राजा मंडळाने केली आहे. याबाबत अंतिम निर्णय झाला असून कोरोना नियम पाळून यंदा लालबागच्या राजाचं आगमन होणार आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या साथीचा प्रभाव लक्षात घेता मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती.

हे देखील पहा -

मात्र या वर्षी लालबागचा राजा पुन्हा एकदा दिमाखात विराजमान होणार आहे. भाविकांना मात्र गर्दी न करण्याचे आवाहन मंडळाने केले आहे. विशेष म्हणजे लालबागच्या भाविकांना यावर्षी घरीच बसून ऑनलाइन माध्यमातून बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे. अशी माहिती लालबाग राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी दिली आहे.

गेल्या वर्षी कोविड १९ संसर्गामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने "आरोग्य उत्सव" साजरा करून आदर्श निर्माण केला होता.अनेक मंडळांनी या निर्णयाचे अनुकरण केले होते. केली जाणार नाही. पाद्यपूजन सोहळा सुद्धा साधेपणाने होईल. लालबागचा राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळते. कोविड काळात अशी गर्दी टाळणे आवश्यक असल्याने त्याबाबतही मंडळाकडून आखणी करण्यात आली आहे.

भक्तांच्या आग्रहाखातर यंदाचा उत्सव गणेश राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तसेच, सरकारने जाहीर केलेल्या नियमावली नुसारच गणेश मूर्तींच्या उंची ठेवली जाणार आहे. त्याचबरोबर कोविड काळातील गर्दी टाळण्यासाठी मंडळाकडून आवश्यक ती खबरदारीदेखील घेतली जाणार आहे. त्यासाठी भाविकांना ऑनलाइन दर्शनाची सुविधा मंडळाकडूनउपलब्ध करुन दिली जाणार असल्याचेही यावेळी सुधीर यांनी सांगितले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Twins Birth : ९ महिन्यात ४२ जुळी मुलं, बीडमध्ये का वाढतेय जुळ्या मुलांची संख्या? तज्ज्ञांनी सांगितलं कारण

Crime: भयंकर! तोकडे कपडे घातल्याचा राग, भावाने ३३ वर्षांच्या बहिणीला संपवलं

Maharashtra Live News Update : मराठा आरक्षण संदर्भात सरकारने काढलेल्या शासन निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणीला सुरूवात

SCSS Scheme: फक्त व्याजातून कमवा २ लाख ४६ हजार रुपये; योजना नक्की आहे तरी काय?

CJI Bhushan Gavai: पश्चात्ताप नाही, जेलला जायला तयार; भूषण गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाची प्रतिक्रिया|VIDEO

SCROLL FOR NEXT