Ladki Bahin Yojana 
मुंबई/पुणे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं! 'या' जिल्ह्यातील तब्बल १० हजार महिलांचे अर्ज बाद

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांपैकी १० हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Dhanshri Shintre

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जाची छाननी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २० लाख ८४ हजार अर्जदारांना योजनेचा लाभ झाल्याची महिला बालकल्याण विभागाची माहिती आहे. योजनेसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातून २१ लाख ११ हजार ३६३ मंजूर करण्यात आले होते. बाकी अर्जाची छाननी बाकी होती. अजूनही १२ हजार अर्जाची छाननी बाकी आहे.

आत्तापर्यंत ९ हजार ८१४ अर्ज त्रुटीमुळे अपात्र ठरले आहेत, तर ५ हजार ८१४ अर्जामध्ये किरकोळ त्रुटी सापडल्याने तात्पुरते नाकारण्यात आले आहेत. पुणे शहरात ६ लाख ८२ हजार ५५ आले. त्यातील ६ लाख ६७ हजार ४० अर्ज मंजूर झाले. तर ३ हजार ४९४ अर्ज अपात्र ठरले आहेत. जिल्ह्यात सर्वात जास्त हवेली तालुक्यात सर्वात जास्त अर्ज आले.

४ लाख १९ हजार ८५९ अर्ज आले तर त्यातील ४ लाख १५ हजार ५१० अर्ज मंजूर करण्यात आले. यातील १ हजार १६६ अर्ज अपात्र ठरले आहे. जिल्ह्यात एकूण २१ लाख ११ हजार ९४६ अर्ज आले त्यातील २० लाख ८४ हजार ३६४ अर्ज मंजूर झाले. तर ९ हजार ८१४ अर्ज अपात्र ठरले.

लाडकी बहीण योजनेसंदर्भात समाजमाध्यमातून चुकीची माहिती प्रसारित करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थी महिलांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यपद्धतीत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. यामुळे अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजनेची सद्यः स्थिती निदर्शनास आणून देण्याच्या सूचना महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT