crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime : मुंबई हादरली! १० वर्षाच्या मुलासमोर महिलेवर बलात्कार; गळ्यावर कोयता ठेवून तडीपार गुंडाचं भयंकर कृत्य

Mumbai crime news today : मुंबईतील कुर्ला परिसरात तडीपार आरोपीने ३९ वर्षीय विवाहित महिलेवर तिच्या १० वर्षीय मुलासमोर अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप आहे.

Namdeo Kumbhar

Kurla woman raped in front of minor son : मुंबईतील कुर्लामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका तडीपार आणि अट्टल गुन्हेगाराने घरात घुसून ३९ वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली. आरोपीने पीडितेच्या १० वर्षांच्या मुलाच्या गळ्यावर कोयता ठेवून महिलेवर जबरदस्ती बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

संबंधित आरोपी आधीपासूनच महिलेचा छळ करत होता. घटना घडल्यानंतर पीडितेने शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. हा प्रकार अल्पवयीन मुलासमोर घडल्यामुळे पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि 'पोक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सोमवारी रात्री महिलेच्या घरात कुसून आरोपीने तिच्या १० वर्षांच्या मुलाला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्यासमोरच बलात्कार केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपीवर यापूर्वी हल्ला, गुन्हेगारी धमकी आणि शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. त्याला याआधी तडीपार करण्यात आले होते. तो गेल्या महिन्याभरापासून त्या महिलेचा पाठलाग करत होता. तिच्यावर अश्लील टिप्पणी करत होता. त्याशिवाय जाता येता अश्लील भाषेत बोलत होता. पण त्या महिलेने त्याच्या या प्रयत्नांकडे अजिबात लक्ष दिले नव्हते.

सोमवारी रात्री ११ वाजता आरोपी महिलेच्या कुर्ल्यातील घरात घुसला. त्याने तिच्या दहा वर्षांच्या मुलाला पकडले आणि त्यानंतर मुलासमोरच त्या महिलेवर बलात्कार केला," असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेनंतर महिलेने स्थानिकांच्या मदतीने कुर्ला पोलिसांशी संपर्क साधला. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तात्काळ आरोपीला बेड्या ठोरल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact-Check: खासदार कंगना रनौतला चोपलं?; Gen Z ना गटारछाप बोलल्याने मारहाण?

अभिजीत दिपकेंच्या भेटीवरून महायुतीत वाद; भाजपकडून संजय शिरसाठ-कडूंवर कारवाईची मागणी

'तुम्ही कधीपर्यंत गुंगी गुडिया बनून राहणार?' काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना डिवचलं

Pradeep Rawat Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा

मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! ब्रँडेड दारूच्या फ्लेवर्सवर बंदी,काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT