Kunal Kamra Controversy Saam tv
मुंबई/पुणे

Kunal Kamra Controversy : हम होंगे कंगाल एक दिन...; शिवसेनेच्या तोडफोडीला कुणाल कामराकडून नव्या व्हिडिओतून उत्तर, पाहा VIDEO

Kunal Kamra Controversy News : हम होंगे कंगाल एक दिन...; असं म्हणत कुणाल कामराने शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं आहे. कुणाल कामराने व्हिडिओतून उत्तर दिलं आहे.

Vishal Gangurde

कुणाल कामराच्या गाण्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. कॉमेडियन कुणाल कामरा आणि शिंदे गटामध्ये चांगलाच वाद पेटला आहे. कामराने एकनाथ शिंदेंवर गाण्यातून टीका केली. त्यानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हॅबिटेट कॉमेडी क्लबची तोडफोड केली. त्याच्या विरोधात पोलिसांत देखील गुन्हा देखील दाखल केला. कुणाल कामराने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या स्टुडिओ तोडफोडीला नव्या गाण्यातून प्रत्युत्तर दिलं आहे. 'हम होंगे कंगाल एक दिन...' असं गाणं पोस्ट करत शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

कुणाल कामराने नव्या व्हिडिओतून शिंदे गटावर टीका केली आहे. 'हम होंगे कंगाल एक दिन, मन में है अंधिविश्वास, देश का सत्यानाश...' असं गाणं नव्या व्हिडिओमध्ये आहे. या व्हिडिओमध्ये शिंदे गटाचे कार्यकर्ते स्टुडिओची तोडफोड करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये कामराने नथुराम गोडसे आणि आसाराम बापूच्या नावाचाही उल्लेख आहे. कुणाल कामराने नवा व्हिडिओ पोस्ट करताच व्हायरल झाला आहे. कुणाल कामराचा नवा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओ हजारो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कुणाल कामराला पोलिसांकडून नोटीस

मुंबई पोलिसांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्यातून टिप्पणी करणाऱ्या कुणाल कामराला नोटीस धाडली आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, खार पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. आम्ही कुणाल कामरा प्राथमिक नोटीस पाठवली आहे. या प्रकरणी चौकशी सुरु झाली आहे

मी माफी मागणार नाही - कुणाल कामरा

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने म्हटलं आहे की, 'मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टिप्पणीविषयी माफी मागणार नाही. यावेळी कुणालने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या स्टुडिओ तोडफोडीवरही टीका केली. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी खारमधील हॅबिटेट कॉमेडी क्लबची तोडफोड केली होती. या कार्यक्रमात 'गद्दार' शब्द उच्चारत शिंदेंवर निशाणा साधला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२, ३ की ४? घर बांधताना किती मजल्यांना मिळते परवानगी? जाणून घ्या काय आहेत बिल्डिंग बायलॉज नियम

Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

Maharashtra News Live Update: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT