kunal kamra  Saam tv
मुंबई/पुणे

Kunal Kamra Controversy : देश सोडून पळावे लागेल, ठाण्याच्या खासदाराचा कुणाल कामराला इशारा

MP Naresh Mhaske Threatens Kunal Kamra: कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. शिंदे गटाच्या खासदाराने कुणाल कामराला इशारा दिला.

Priya More

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केलेल्या टिप्पणीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. कुणाल कामराने एका कार्यक्रमात गद्दार हा शब्द वापरून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. त्याने एकनाथ शिंदेंवर गाणं देखील गायलं. त्यानंतर जोरदार राडा झाला आणि शिंदेसेनेने कुणाल कामराच्या खार येथील सेटची तोडफोड केली.

कुणाल कामाराने माफी मागावी अशी मागणी शिंदेसेनेने केली आहे. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी कुणाल कामराला थेट इशारा दिला. नरेश म्हस्के यांनी कुणाल कामराला थेट इशारा देत सांगितले की,'शिवसैनिक आता कुणाल कामराला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. कुणाल कामरा शिवसैनिक तुला सोडणार नाहीत.'

उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, 'असे भाड्याने घेतलेले स्टँड-अप कॉमेडियन काही पैशांसाठी तुमच्यासाठी काम करत आहेत. आता तुमच्याकडे कार्यकर्ते उरले नाहीत. पण शिवसैनिक कुणाल कामराला योग्य उत्तर देतील.', असे म्हणत नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटावर देखील टीका केली.

खासदार नरेश म्हस्के यांनी कामराला धमकी दिली की, 'त्याला भारतातून पळून जाण्यास भाग पाडले जाईल. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याचे परिणाम आता कामराला भोगावे लागतील.' नरेश म्हस्के यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली. दरम्यान, शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी कुणाल कामराची धुलाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यानी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, 'उद्या ११ वाजता कुणाल कामराची धुलाई.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

SCROLL FOR NEXT