Kunal Kamra : एकनाथ शिंदेंविरोधात गाणं, कुणाल कामराच्या सेटची तोडफोड अन् धमकी; ४० शिवसैनिकांवर गुन्हा, राहुल कनाल पोलिसांच्या ताब्यात

kunal kamra eknath shinde raw : कुणाल कामरा यानं एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केलेल्या कवितामुळे वाद उफळला आहे. कुणाल कामराच्या याच्या सेटची शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. याप्रकरणी ४० शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
kunal kamra eknath shinde raw
kunal kamra eknath shinde raw
Published On

kunal kamra eknath shinde raw : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात गाणं म्हटल्यानंतर नवा वाद उफळला आहे. शिंदेसेनेने कुणाल कामराच्या सेटची तोडफोड केली. खार येथील सेटवर शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करत कुणाल कामरा याला इशारा दिला आहे. कुणाल कामरा याने माफी मागावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. दरम्यान, आमदार उदय सामंत आणि खासदार नरेश म्हस्के यांनी कुणाल कामरा याला इशारा दिला आहे.

सेटची तोडफोड, ४० शिवसैनिकांवर गुन्हे

कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या गाण्यामुळे नवा वाद उभा राहिला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी कुणाल कामरा याला सपोर्ट केला आहे. कुणाल कामरा याने केलेले गाणं १०० टक्के खरं असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. दुसरीकडे कुणाल कामरा याच्या खार येथील सेटवर शिवसैनिकांनी धुडगूस घातला. याप्रकरणी पोलिसांकडून ४० शिवसैनिकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राहुल कनाल याला तोडफोडप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

kunal kamra eknath shinde raw
Kunal Kamra : 'ठाण्याची रिक्षा, चेहऱ्यावर दाढी...', कुणाल कामराचं एकनाथ शिंदेंवर गाणं; संजय राऊतांकडून ट्वीट, शिंदे गटाचा इशारा

कुणाल कामरा याचं नेमकं गाण काय?

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं महाराष्ट्राच्या राजकारणावर कविता सादर केली. त्याने एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कविता सादर केली. कामरा याने आपल्या कवितेत म्हटले की, शिवसेना शिवसेनेतून बाहेर आली. राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून बाहेर आली. हा प्रकारात सर्वच कन्फूज झाले. हा प्रकार एकाने सुरु केला होता, असे सांगत गाण्याचे बोल सुरु होतात. ‘ठाणे की रिक्षा चेहर पर दाढी, ऑख पर चष्मा….मेरी नजर से देखो तो गद्दार नजर आये….पारिवारिक कलह को खत्म करना चाहते थे। उन्होंने किसी के पिता को चुरा लिया। इसका क्या जवाब होगा? क्या मैं कल तेंडुलकर के बेटे से मिलूं, भाई, चलो डिनर करते हैं। मैं तेंदुलकर की प्रशंसा करता हूं और उनसे कहता हूं, भाई, आज से वे मेरे पिता हैं।

सामंतांचा इशारा -

मंत्री आणि शिवसेना आमदार उदय सामंत यांनी कुणाल कामरा याला इशारा दिला आहे. ते म्हणाले की, हा कुणाल कामरा कोण आहे? जर एकनाथ शिंदे यांच्या विरोधात काही गाणे गायले असेल तर त्याच्या विरोधात शिवसेना आक्रमक होणार आहे. आमचे आमदार मुरजी पटेल हे कुणाल कामरा यांच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करतील. त्यांनी माफी मागितली नाही तर शिवसैनिक आक्रमक होतील.

नरेश म्हस्केंची धमकी -

ठाण्याचे शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी कुणाल कामरा याला खुली धमकी दिली आहे. भाड्याचे कॉमेडियन काही पैसे घेतात अन् टीका-टिप्पणी करतात. आमच्या नेत्यावर टिप्पणी केली आहे. कुणाल कामरा तू आता महाराष्ट्रात नाही तर भारतातही कुठे फिरू शकणार नाही. आमचे शिवसैनिक तुला जागा दाखवतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com