Kumar Vishwas Swasthyam 2022 Saam TV
मुंबई/पुणे

Swasthyam 2022 : डॉ. कुमार विश्वास करणार ‘सकाळ स्वास्थ्यम’चे उद्‍घाटन; जाणून घ्या सर्वकाही

Kumar Vishwas Swasthyam 2022: ‘सकाळ स्वास्थ्यम’च्या उद्‍घाटनाचा सोहळा शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता स्वारगेटजवळील गणेश कला-क्रीडा मंच येथे होणार आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Swasthyam 2022: चांगल्या मानसिक आरोग्यासाठी मनाची शांती महत्वाची आहे. शरीरासोबत मानसिक आरोग्यही महत्वाचं आहे. नागरिकांची ही गरज ओळखून, ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘वुई आर इन धिस टुगेदर’ मोहिमेअंतर्गत विश्वकल्याणाच्या उद्देशाने ९ ते ११ डिसेंबरदरम्यान पुण्यात पाच वेगवेगळ्या ठिकाणी तीन दिवसीय संपूर्ण आरोग्यासाठी (Health) ‘स्वास्थ्यम्’ उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. डॉ. कुमार विश्वास यांच्या हस्ते ‘सकाळ स्वास्थ्यम’चे उद्‍घाटन येत्या शुक्रवारी (ता. ९) होणार आहे.  (Sakal Swasthyam 2022 News)

प्रेम, नाते-संबंध, समाजकारण- राजकारणाच्या सद्यःस्थितीवर कवितांच्या माध्यमातून नेमके बोट ठेवणारे आणि युवकांमध्ये कमालीचे लोकप्रिय असलेले प्रख्यात कवी आणि खुमासदार वक्ते म्हणून देशभर ओळख असलेल्या डॉ. कुमार विश्वास यांच्या हस्ते ‘सकाळ स्वास्थ्यम’चे उद्‍घाटन येत्या शुक्रवारी (ता. ९) होणार आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन नागरिकांना मिळणार आहे. (LIVE Marathi News)

‘सोहळा स्वास्थ्याचा, जागर आरोग्याचा’ या उपक्रमातून आनंदी जीवनाचे धडे नागरिकांना सलग तीन दिवस (९, १० आणि ११ डिसेंबर) मिळणार आहे. ‘सकाळ स्वास्थ्यम’च्या उद्‍घाटनाचा सोहळा शुक्रवारी (ता.९) सायंकाळी सहा वाजता स्वारगेटजवळील गणेश कला-क्रीडा मंच येथे होणार आहे. डॉ. कुमार विश्वास यांच्या हस्ते त्याचे उद्‍घाटन झाल्यावर ‘दैनंदिन जीवन समृद्ध करण्यासाठी रामायण आणि महाभारतातील शिकवण’ या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे.

‘कोई दिवाना कहता है’, ‘हुनर बोलते है’, ‘जवानी में कई गझलें’, ‘तुम अपना कहती थी’ या डॉ. विश्वास यांच्या कविता प्रचंड गाजल्या असून सोशल मीडियावर त्यांना लाखो फॉलोअर्स आहेत. ‘रो लिए तुम बिन’ या त्यांच्या कवितेला तब्बल ५४ लाख नागरिकांनी पसंती दर्शविली आहे. युवकांमध्ये त्यांची मोठी क्रेझ असून आबालवृद्धांचीही त्यांना पसंती आहे. (Breaking Marathi News)

समाजकारण, राजकारण या विषयावरही डॉ. विश्वास यांची खुमासदार व अनोख्या शैलीतील फटकेबाजी देशातील विविध शहरांतील नागरिकांना भावली आहे. राजकीय नेते म्हणूनही परिचित असलेले डॉ. कुमार विश्वास गुजरात निवडणुकीच्या धामधुमीतून खास वेळ काढून ‘सकाळ स्वास्थ्यम’च्या उदघाटनासाठी पुण्यात येत आहेत. त्या प्रसंगी त्यांचे होणारे व्याख्यान हे पुणेकरांसाठी पर्वणी ठरणार आहे.

तीन दिवसांत यांचे मिळणार मार्गदर्शन व विषय

डॉ. हंसाजी योगेंद्र : योगा : अ होलिस्टिक अ‍ॅप्रोच फॉर हेल्थ अँड वेलबिइंग

नूपुर पाटील : लर्न द रिअल मिनिंग ऑफ द वर्ड डाएट

अॅक्शन दिग्दर्शक चित्ता शेट्टी : मार्शल आर्ट्स द्वारे शारीरिक तंदुरुस्ती व स्वास्थ्य

ख्यातनाम कवी, व्याख्याते कुमार विश्वास : दैनंदिन जीवन समृद्ध करण्यासाठी रामायण आणि महाभारतातील शिकवण

प्रियांका पटेल : इमर्सिव्ह साउंड्स : साउंड हीलिंग कार्यशाळा

सूफी गायिका रुहानी सिस्टर्स व शास्त्रीय गायक, संगीतकार उस्ताद राशीद खान : मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत व गायन

अध्यात्म गुरू संत श्री गौरांग दास : आनंदी जीवनाची कला

अभिनेत्री शिल्पा शेट्टी : कीप इट सिम्पल - योगा आणि फिटनेस

डॉ. राजेंद्र बर्वे : आजची नवीन सामान्य स्थिती आणि मन

योगगुरू श्री एम : योग, अनंत क्षमतेचा मार्ग

सर्वेश शशी : योगा, फिटनेस आणि त्यापलीकडे

अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जिनिलिया देशमुख : लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन

असे व्हा सहभागी...

मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यासाठीच्या ‘स्वास्थ्यम्’ या नावीन्यपूर्ण उपक्रमात सर्व वयोगटातील आणि विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी होऊ शकतात. तसेच योग, प्राणायाम, अध्यात्म, तंदुरुस्ती आदी क्षेत्रांत कार्यरत असलेल्या विविध संस्था, ग्रुप्स यांनाही सहभागी होता येईल. त्यासाठी खालील वेबसाइट ओपन करून रजिस्ट्रेशन करू शकता.

https://www.globalswasthyam.com/

उपक्रमाच्या माहितीसाठी व अपडेट मिळविण्यासाठी वेबसाइट व खालील सोशल मीडिया पेजेसला भेट द्या !

Facebook: https://www.facebook.com/globalswasthyam

Instagram: https://www.instagram.com/globalswasthyam/

Twitter: https://twitter.com/GlobalSwasthyam

LinkedIn: https://www.linkedin.com/company/global-swasthyam

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

SCROLL FOR NEXT