Pune Koyata Gang Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात पुन्हा कोयता गँगचा सुळसुळाट; येरवडा परिसरात 10 ते 12 वाहनांची तोडफोड, परिसरात घबराट

Pune Crime News: पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी (ता.२६) रात्री कोयता गँगच्या गुंडांनी येरवडा परिसरात उभ्या असलेल्या १० ते १२ वाहनांची तोडफोड केली आहे.

Satish Daud

सचिन जाधव, साम टीव्ही पुणे

Pune Koyata Gang Latest News

शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. ड्रग्ज तस्करीचं प्रकरण ताजं असताना दुसरीकडे पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी (ता.२६) रात्री कोयता गँगच्या गुंडांनी येरवडा परिसरात उभ्या असलेल्या १० ते १२ वाहनांची तोडफोड केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत दोन जणांना अटक केली आहे. अजय चित्रगुप्त बागरी आणि सुमित भारत सितापराव, अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. (Latest Marathi News)

येरवडा पोलिसांनी (Police) आरोपींवर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुमित आणि अजय सोमवारी रात्री येरवडा परिसरात आले. त्यांनी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना धमकावण्यास सुरुवात केली.

आरोपींच्या हातात कोयता तसेच हॉकी स्टिक असल्याने पुणेकर चांगलेच धास्तावले होते. दरम्यान, काही वेळानंतर आरोपींनी भररस्त्यात धुमाकूळ घातला. तसेच परिसरात उभ्या असलेल्या १० ते १२ वाहनांची तोडफोड केली. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते.

पुणे ड्रग्ज प्रकरणात धक्कादायक माहिती

पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्लीतून १४० किलो मफेड्रोन ड्रग्जची लंडनमध्ये तस्करी करण्यात आल्याची कबुली आरोपींनी पोलिसांसमोर दिली आहे. आरोपी दिवेश भुटीया, संदीप कुमार आणि संदीप यादव याच्यावर लंडनला ड्रग्ज पाठवण्याची जबाबदारी असल्याचं समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: साकोलीत नाना पटोले पिछाडीवर

Maharashtra Election Result: भाजपला १२०+ जागा मिळणार! निकालाआधीच भाजपच्या नेत्याचा दावा

Amla Pickle: आवळ्याचे लोणचे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, जाणून घ्या कारणे...

Maharashtra Election Result : 'महायुतीचे सरकार बनण्यामागे लाडक्या बहिणींचा मोठा हात'

Sanjay Raut Press Conference : हा जनतेचा कौल नाही, हे निकाल अदानींनी लावून घेतलेत; संजय राऊत बरसले

SCROLL FOR NEXT