कोपर रेल्वे स्टेशनला आता होम प्लॅटफॉर्मची सुविधा...
कोपर रेल्वे स्टेशनला आता होम प्लॅटफॉर्मची सुविधा... प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

कोपर रेल्वे स्टेशनला आता होम प्लॅटफॉर्मची सुविधा...

प्रदीप भणगे

डोंबिवली : कोपर रेल्वे स्टेशनला होम प्लॅटफॉर्म तयार केला असून याचा उपयोग आता कोपर पश्चिम आणि अप्पर कोपर मधील प्रवाशांना होणार आहे. होम प्लॅटफॉर्मसाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवली आणि कोपर आता या चारही स्टेशनला होम प्लॅटफॉर्मची सुविधा रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे दिवा रेल्वे स्टेशनला होम प्लॅटफॉर्मची सुविधा द्या अशी मागणी आता दिव्यातील प्रवासी आणि नागरिक करू लागले आहेत. (Kopar railway station now has home platform facility)

हे देखील पहा -

मध्य रेल्वे मार्गावरील दिवा आणि डोंबिवली स्थानकाच्या मध्यभागी असलेले कोपर रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. येथून दररोज सुमारे 35 ते 40 हजार प्रवासी प्रवास करत असून दररोजचे उत्पन्न सुमारे अडीच लाख रुपये आहे. लॉकडाऊनमुळे प्रवासी कमी झाले असले तरी भविष्यात हे प्रवासी वाढणार आहेत. तसेच दिवा-वसई मार्गावरील अप्पर कोपर हे महत्त्वाचे स्थानक असून या स्थानकावरुन पनवेलपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. कोपर स्थानकावर एकमेव पादचारी पूल असून गर्दीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. विशेषतः दिवा-वसई गाडीच्या वेळेत पुलावरुन प्रवास करणे कठीण होते. ही गर्दी लक्षात घेता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार करुन पुलाची रुंदी वाढविण्यात यावी, शिवाय कोपर स्थानकात होम प्लॅटफॉर्म व मुंबई दिशेला पादचारी पुलाची उभारणी करण्यात यावी अशी मागणी केली होती.

या कामस रेल्वे प्रशासनाने मंजुरी देत कामाला सुरवात केली आहे. आता कोपर रेल्वे स्टेशनला होम प्लॅटफॉर्म तयार केला असून याचा उपयोग आता कोपर पश्चिम आणि अप्पर कोपर मधील प्रवाशांना होणार आहे. तसेच सकाळी अनेक प्रवासी कोपर स्थानकातून कल्याण, डोंबिवली लोकलने डाऊन करुन जातात. तसेच दिवा-वसई मार्गावरील प्रवासी कोपर स्थानकात आल्यास या फलाटावरही प्रचंड गर्दी होते, अशावेळी काही प्रवासी लोकलमध्ये बसण्यास जागा मिळावी म्हणून या होम प्लॅटफॉर्मवरुन प्रवासी गाडीत चढतात. सायंकाळीही गर्दीच्या वेळेस कोपर दिशेला उतरण्यास न मिळाल्यास प्रवासी विरुद्ध दिशेने उतरणे पसंत करत आहेत. 

कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवली आणि कोपर आता या चारही स्टेशनला होम प्लॅटफॉर्मची सुविधा रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे दिवा रेल्वे स्टेशनला होम प्लॅटफॉर्मची सुविधा द्या अशी मागणी आता दिव्यातील प्रवासी आणि नागरिक करू लागले आहेत. आता रेल्वे प्रशासन याकडे लक्ष देते हे पहावे लागेल.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: लग्नाचा योग, व्यवसायात यश; तुमच्या राशीत काय?

Todays Horoscope: व्यवहारात सतर्कता, जोडीदारासोबत प्रेमाने वागा; जाणून घ्या तुमच्या राशीत काय?

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

SCROLL FOR NEXT