Kopar Khairane Crime News  Saam TV
मुंबई/पुणे

Kopar Khairane: प्रेयसीच्या वाढदिवशीच तिला लॉजवर नेलं अन् हत्या केली, नेमकं काय घडलं?

Kopar Khairane News : खैरणे एमआयडीसीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> सिद्देश म्हात्रे

Kopar Khairane Crime News:

खैरणे एमआयडीसीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खैरणे येतील आश्वी लॉजिंगमध्ये आरोपी शोएब शेख या तरुणाने आपली प्रेयसी अॅमी उर्फ अमित सिंगची हत्या केल्याचं सांगण्यात येत हे.

आरोपी हा साकीनाका परिसरात वास्तव्यास असून अमित कौर ही जुईनगर मधील खाजगी बँकेत मॅनेजर पदावर नोकरीला होती. शोएब आणि अमित यांची तीन महिन्यापूर्वीच ओळख झाली होती. शोएब हा 24 वर्षांचा असून त्याची प्रेयसी अमित कौर त्याच्यापेक्षा अकरा वर्षांनी मोठी होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमित कौरचे घटस्फोट झाला असून तिला एक मुलगी देखील आहे. शोएबला अमित कौर हिचेअन्य पुरुषांशी प्रेम संबंध असल्याचा संशय होता. याच संशयावरून अमित कौर हिच्या वाढदिवशी पार्टी झाल्यानंतर शोएबने अमित कौरची हत्या करण्याचा प्लॅन बनवला होता. (Latest Marathi News)

त्यानुसार शोएबने अमित कौरची हत्या केली. हत्येनंतर शोएब हा आपल्या राहत्या घरी गेला. मात्र त्याच्या हालचालीवर एका व्यक्तीला संशय आल्याने त्याने पोलिसांना याची माहिती दिली. साकीनाका पोलिसांनी शोएबला ताब्यात घेत चौकशी केली असता सर्व घटना समोर आली.

याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी तुर्भे पोलीसांशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. दरम्यान, याप्रकरणी तुर्भे पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहे. तसेच हत्याच नेमकं कारण काय आहे, याच शोध ही पोलीस घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चिपळूण शहरातील पेठमाप परिसरातील भर लोकवस्तीत शिरली मगर

समुद्रातल्या जहाजात चोरी करायला गेले, चार चोरांचा मृत्यू; मुंबईतील खळबळजनक घटना

Apple Vs Guava: सफरंचद की पेरू, डायबिटीजच्या रूग्णांनी कोणते फळ खावे?

Property Registration : जमिनीच्या खरेदी-विक्री, वाटणीसह ६३ प्रकारच्या नोंदीसाठी आधार सक्तीचे, फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Raigad Fort : तटबंदी नाही, बुरुज नाहीत; तरीही खास आहे रायगडचा 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT