गणेशोत्सवापूर्वीच कोपर उड्डाणपूल प्रवाशांसाठी खुला होणार? प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

गणेशोत्सवापूर्वीच कोपर उड्डाणपूल प्रवाशांसाठी खुला होणार?

डोंबिवली शहराच्या पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्वाचा पूल म्हणजे कोपर पूल. या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली : शहराच्या पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्वाचा पूल म्हणजे कोपर पूल. या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सदर पुलाच्या कामाची पाहणी आज केडीएमसी अधिकारी व माजी सभापती दीपेश म्हात्रे यांनी केली. (Kopar flyover will be open for passengers before Ganeshotsav?)

हे देखील पहा -

पुलाचे राहिलेले मास्टिक अस्फाल्ट (डांबरीकरण) आणि रंगरंगोटीचे कामाला सुरवात करणार आहोत. गणेशोत्सवापूर्वीच कोपर उड्डाणपूल खुला करण्याचा आमचा मानस आहे असे दीपेश म्हात्रे यांनी यावेळी सांगितेल. तसेच कोपर पुलाचे श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी, सर्व कर्मचारी वर्ग आणि प्रत्येकाने या पुलासाठी पाठपुरावा केलेला आहे. हा पूल लवकर होण्यासाठी अनेक लोकांनी पाठपुरावा केला. परंतु काही लोकांनी याच्यामध्ये अनंत अडचणी आणण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही या पुलाच्या उद्घाटनाला बोलावलं पाहिजे अशी माझी मागणी आहे. अनेक पक्षांचे लोक सांगत होते की बिल्डिंग वाचवा, ते येथे राहतात. ती बिल्डींग वाचवण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले ते सांगत होते. पुलाचा इथे ओपनिंग द्या म्हणजे जेणेकरून त्यांना पार्किंग करता येईल अनंत अडचणी त्या लोकांनी इथं तयार केल्या आणि त्यांच्यामुळेच पुलाच्या कामाला दिरंगाई झाली असे म्हात्रे यांनी सांगितले.

कोपर उड्डाणपूल कमकुवत झाल्याने सप्टेंबर २०१९ मध्ये तातडीने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. हा पूल पाडून तेथे नवीन पूल बांधण्याचे काम सुरू आहे. जूनमध्ये पूल बांधणीचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले होते; परंतु अद्याप या पुलाचे काम मार्गी लागलेले नाही. त्यामुळे गेले दोन वर्षांपासून ठाकुर्ली पुलावरून वाहनांना पूर्व-पश्चिम ये-जा करावी लागत आहे. आता मात्र या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आता म्हात्रे यांनी सांगितल्यानुसार गणेशोत्सवापूर्वीच कोपर उड्डाणपूल खुला होता का हे पाहावे लागेल.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

SCROLL FOR NEXT