Konkan Ganpati Special Train 2023 mumbai madgaon and mumbai sawantwadi train Two Extra Coach Saam Tv
मुंबई/पुणे

Ganapati Special Trains: कोकणवासियांसाठी गुड न्यूज, आता तिकिट होणार कन्फर्म; 'या' दोन रेल्वेगाड्यांना अतिरिक्त डबे

Satish Daud

Konkan Ganpati Special Train 2023: गणेशोत्सव अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असून कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांनी रेल्वेतिकिटं बुकिंग करण्यास सुरूवात केली आहे. अनेक गाड्या फुल्ल झाल्याने प्रवाशांची तिकीटं वेटिंगवर पडली आहेत. त्यामुळे अडचणी निर्माण होत असून मोठ्या गर्दी होण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेता, आता रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

कोकणात जाणाऱ्या (Kokan News) चाकरमान्यांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने कोकण, मुंबई-मडगाव आणि मुंबई-सावंतवाडी रोड या गाड्यांच्या एकूण २२ फेऱ्यांना प्रत्येकी दोन डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या विशेष एक्स्प्रेसमधील वेटिंग लिष्टवर असलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रेल्वे प्रशासनाने (Railway) गणेशोत्वानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी सीएसएमटी-मडगाव आणि सीएसएमटी-सावंतवाडी रोड या दोन गणपती विशेष ट्रेनची घोषणा केली होती. या रेल्वेगाड्यांच्या प्रत्येकी २२ फेऱ्या चालवण्यात येणार आहे. या गाड्यांचे आरक्षणही हाऊसफुल्ल झाले आहे.

मात्र, प्रवाशांची वाढती मागणी आणि शेकडोंपार गेलेली वेटिंग लिष्ट लक्षात घेता, प्रत्येक गाडीला शयनयान श्रेणीचे अतिरिक्त दोन डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही गाड्यांची डब्याची संख्या २० वरून २२ डब्यावर पोहचणार आहे.

या २० शयनयान श्रेणीचे डबे आणि दोन डबे सीटींग कम लगेज या श्रेणीतील असणार आहे. आता या दोन्ही रेल्वे गाड्यांचा सुधारित संरचनेनुसार उत्सव विशेष फेऱ्या एलएचबी रेल्वेगाड्याऐवजी आयसीएफ रेल्वेगाडीमध्ये धावणार आहे. दरम्यान, या गाड्यांचे आरक्षण केलेल्या प्रवाशांनी आपले तिकीट तपासून पुढील नियोजनाला सुरूवात करावी, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT