Konkan Toll Exemption News Saam TV
मुंबई/पुणे

Ganpati Festival: बाप्पा पावला! कोकणात गणपतीला जाणाऱ्यांसाठी टोलमाफी, सरकारचा मोठा निर्णय

Konkan Toll Exemption News: बाप्पा पावला! कोकणात गणपतीला जाणाऱ्यांसाठी टोलमाफी, सरकारचा मोठा निर्णय

Satish Kengar

Konkan Toll Exemption News:

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. कोकणात गणपतीला जाणाऱ्या भक्तांसाठी राज्य सरकारने टोलमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ही टोलमाफी १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान असणार आहे. सरकारने याबाबत एक परिपत्रक ही प्रसिद्ध केलं आहे. या परिपत्रकात सांगण्यात आले आहे की, आगामी सन २०२३ च्या आगामी गणेशोस्तव कालावधीत "कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना गणेशोस्तवानिमित्त पथकर (Toll) माफी व इतर सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुचना व निर्देश दिलेत.

या पत्रकात पुढे लिहिलं आहे की, ''२०२३ च्या गणेशोस्तवाकरिता कोकणात जाणाऱ्या भाविकांना / वाहनांना पथकरातून सूट देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने १६.०९.२०२३ ते १.१०.२०२३ या कालावधीत मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग (राम-४८), मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग (राम -६६) वरील व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यावर कोकणात जाणाऱ्या गणेशोस्तव भाविकांना / वाहनांना तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसना सवलत देण्यात येत आहे.  (Latest Marathi News)

गणेशभक्तांना गाडीवर लावावं लागेल 'गणेशोस्तव २०२३, कोकण दर्शन' स्टीकर्स

टोलमाफी मिळवण्यासाठी गणेशभक्ताना आपल्या गाडीवर 'गणेशोस्तव २०२३, कोकण दर्शन' हे स्टिकर लावावं लागणार आहे.

पत्रकात म्हटलं आहे की, याकरिता सोबत जोडल्याप्रमाणे “गणेशोस्तव २०२३, कोकण दर्शन* अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पासेस त्यावर गाडी क्रमांक. चालकाचे नाव असा मजकूर नमूद करुन ते स्टीकर्स (पासेसचा नमुना सोबतचे जोडपत्र अ प्रमाणे) आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस / पोलीस, संबंधीत प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ) यांनी समन्वय साधून पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या व आर. टी. ओ. ऑफिसेस मध्ये उपलब्ध करुन देण्यात यावेत. तसेच सदरचे पास परतीच्या प्रवासाकरीता ग्राह्य धरण्यात येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT