New Smartphone: 108MP कॅमेरा, पॉवरफुल फ्लॅश लाईट; BMW टच; किती आहे Infinix च्या या नवीन फोनची किंमत...

Infinix Note 30 VIP Racing Edition: 108MP कॅमेरा, पॉवरफुल फ्लॅश लाईट; BMW टच; किती आहे Infinix च्या या नवीन फोनची किंमत...
Infinix Note 30 VIP Racing Edition
Infinix Note 30 VIP Racing EditionSaam Tv
Published On

Infinix Note 30 VIP Racing Edition Launched:

जबरदस्त फीचर्स आणि स्टायलिश लूकसह Infinix चा स्मार्टफोन बाजारात दाखल झाला आहे. आम्ही Infinix Note 30 VIP Racing Edition बद्दल बोलत आहोत. कंपनीने गुरुवारी (14 सप्टेंबर) निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये हा फोन लॉन्च केला. फोन MediaTek Dimensity 8050 प्रोसेसरने सुसज्ज आहे आणि नियमित Infinix Note 30 VIP प्रमाणेच फीचर्स पॅक देतो.

मात्र याच्या डिझाइन आणि पॅकेजिंगमध्ये फरक आहे. नवीन फोनसाठी Infinix ने BMW च्या Designworks सोबत हातमिळवणी केली आहे. याच्या मागील पॅनलवर त्रि-कलर लाईट बँड आहे आणि BMW-थीम असलेल्या रिटेल पॅकेजसह येतो. रेसिंग एडिशन 68W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी पॅकसह येतो. यातच याची किंमत किती आहे आणि यात काय खास आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.

Infinix Note 30 VIP Racing Edition
Mini Electric Car: मिनी पण जबरदस्त; टू-डोअर इलेक्ट्रिक कार अवघ्या 3.47 लाखात लॉन्च; एका चार्जमध्ये मुंबई-पुणे 4 फेऱ्या मारता येतील...

Infinix Note 30 VIP Racing Edition किंमत

नवीन Infinix Note 30 VIP रेसिंग एडिशन निवडक जागतिक बाजारपेठेत सुमारे 315 डॉलर्स (अंदाजे 26,000 रुपये) किमतीत खरेदीसाठी उपलब्ध असेल. मात्र यात किती रॅम आणि किती स्टोरेज असेल, हे कंपनीने अद्याप सांगितलेले नाही. हा नवा फोन भारतात कधी लॉन्च केला जाईल याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.  (Latest Marathi News)

Infinix Note 30 VIP ची प्रारंभिक किंमत 299 डॉलर्ससह (अंदाजे 24,६०० रुपये) जूनमध्ये लॉन्च करण्यात आली. हा फोन 256GB स्टँडर्ड ऑनबोर्ड स्टोरेजसह 8GB आणि 12GB रॅम पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला होता.

Infinix Note 30 VIP Racing Edition
Government Schemes: मुलींसाठी जबरदस्त 5 सरकारी योजना; शिक्षणापासून लग्नापर्यंत, कधीही पैशाची कमतरता भासणार नाही...

Infinix Note 30 VIP Racing Edition मध्ये काय आहे खास?

Infinix Note 30 VIP Racing Edition ची फीचर्स नियमित मॉडेल सारखीच आहेत. हा Android 13 आउट-ऑफ-द-बॉक्सवर आधारित XOS 13 वर चालतो आणि 120Hz रीफ्रेश रेट, 900 nits पीक ब्राइटनेस आणि 1920Hz PWM डिमिंगसह 6.67-इंच फुल-एचडी प्लस (1080x2400 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले फीचर्ससह येतो. रेग्युलर Infinix Note 30 VIP प्रमाणे, रेसिंग एडिशन देखील ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 8050 प्रोसेसर, 12GB पर्यंत RAM आणि ARM Mali G77 MC9 3D GPU सह येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com