kolipada women morcha for regular water supply  saam tv
मुंबई/पुणे

Shahapur : पाण्यासाठी काेळीपाड्यातील महिलांची 50 किलोमीटरची पायपीट, गट विकास अधिका-यांना विचारला जाब

Siddharth Latkar

- फय्याज शेख

Shahapur :

शहापूर तालुक्यातील कोळीपाडा येथे तीव्र पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. याबराेबरच येथील ग्रामस्थांना टॅंकरच्या माध्यमातून हाेणारा पाणी पूरवठा दुषित असल्याची तक्रार महिला करु लागल्या आहेत. कोळीपाडा येथे सुरळीत पाणी पूरवठा व्हावा यासाठी महिलांनी गटविकास अधिकारी कार्यालयावर माेर्चा काढला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडा (mla daulat daroda) यांच्या ग्रामपंचायत हद्दीत पाणी टंचाईने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. कोळीपाडा येथे लोकांना दुषित पाणी पुरवठा केला जात असल्याने महिला आक्रमक झाल्या आहेत.

आज महिलांनी शहापूर गट विकास अधिकारी यांना घेरावा घालत कार्यालयातच ठाण मांडले. कोळीपाडा या आदिवासी पाड्यात तीव्र पाणीटंचाई असून या ठिकाणी टॅक्करने दुषित पाणी पुरवठा केला जातो असे महिलांनी नमूद केले. (Maharashtra News)

हे पाणी दोन दिवसाआड येत असल्याने ग्रामस्थांची गैरसाेय हाेत आहे. दूषित पाण्यामुळे येथील ग्रामस्थांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळेच 50 किलोमीटरचा प्रवास करून शहापूर पंचायत समिती गाठत महिलांनी पाणी टंचाईबाबतच्या समस्यांचा पाढा गट विकास अधिकारी यांच्या समोर मांडला. यावेळी प्रशासनाने उपाययाेजना करण्याचे आश्वासन महिलांना दिले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indurikar Maharaj Kirtan: 'स्वार्थासाठी धर्माचे भांडवल करू नका, गरिबांच्या पोरांचा बळी घेऊ नका', इंदुरीकर महाराजांनी नेत्यांना फटकारले

Maharashtra Politics : अजितदादांचं ठरलं! ७० हून अधिक जागांवर दावा, विद्यमान आमदारांनाही मोठा दिलासा!

Shukraditya Rajyog: सूर्य-शुक्राच्या युती बनला शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींच्या सर्व इच्छा होणार पूर्ण

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT