मुंबई/पुणे

Bhaucha Dhakka : भूमिपूत्रांवर बांग्लादेशींची भाईगिरी; भाऊच्या धक्क्यावर कोळी बांधवांनाच धक्का, VIDEO

Bhaucha Dhakka fish market : बांगलादेशींची मुंबईत घुसखोरी कमी होती की काय? आता त्यांनी थेट मुंबईचे आद्य नागरिक कोळी बांधवांवरच भाईगिरी करायला सुरुवात केलीय... त्यांनी भाऊच्या धक्क्यावर मराठी कोळी बांधवांनाच धक्का देण्याचा कट रचलाय... त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

Snehil Shivaji

सात बेटांच्या बनलेल्या या मुंबईचे मूळ भूमिपुत्र हे कोळी बांधव. मासेमारी करुन उदरनिर्वाह हा कोळी बांधवांचा शेकडो वर्षांचा व्यवसाय. मात्र सध्या या मुंबईच्या मूळ नागरिकांच्या मूळावर बांग्लादेशी उठलेत. होय तुम्ही जे ऐकताय ते सत्यय. मराठमोळ्या मुंबईतील प्रसिद्ध अशा भाऊच्या धक्क्यावर बांग्लादेशी बांडगूळ उगवली असून त्यांनी आपल्या दहशतीनं कोळी बांधवांना बेजार केलंय. भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय घडतंय.

भाऊच्या धक्यांवर कोळी बांधवांना धक्काबुक्की?

भाऊच्या धक्क्यावर बांग्लादेशींनी थाटला व्यवसाय

कोळी बांधवांच्या जागा बांग्लादेशींनी बळकावल्या

बांग्लादेशींची कोळी बांधवांवर दमदाटी करत दादागिरी

कोळी बांधवांना व्यवसाय करण्यास अडचणी

गेल्या अनेक दिवसांपासून मराठी कोळी बांधवांना हे बांग्लादेशी त्रास देत असल्याचं समोर आलंय. मात्र आतापर्यंत त्यांच्याविरोधात ठोस कारवाई न झाल्यानं या सर्व कोळी बांधवांनी बंदरे आणि विकासमंत्री नितेश राणेंकडे आपल्या व्यथा मांडल्या त्यानंतर नितेश राणेंनी भाऊच्या धक्क्याला भेट देत या बांग्लादेशींना आपल्या शब्दात कडक दम भरलाय.

एकीकडे सरकारची बांग्लादेशींना देशातून हूसकावून लावण्याची मोहीम सुरुये तर दुसरीकडे हेच बांग्लादेशी राजरोसपणे मुंबईत वावरत आहेत आणि मराठी माणसाच्या मूळावरचं उठले आहेत. त्यामुळे आता या बांग्लादेशींच्या ताबडतोब बंदोबस्त करण्याची वेळ आलीये इतकं मात्र खरं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT