Vanraj Andekar Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा मुळशी पॅटर्नसारखा थरार घडलाय. रविवारी नाना पेठेत गोळीबार आणि तलवारीचा नंगा नाच पाहायला मिळाला. या हल्ल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar News) यांचा मृत्यू झालाय. याप्रकरणानंतर हत्या का करण्यात आली, नेमकं कारण काय होतं? पाच राऊंड फायर केल्या, एकही गोळी लागल नाही तर आंदेरकरांचा मृत्यू कसा झाला, यासारखे प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ कारवाई करत आतापर्यंत चार जणांना ताब्यात घेतले आहे. वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या जवळच्याच दोन व्यक्तींचा हात असल्याचं पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
नाना पेटेत (Pune Nana Peth) रविवारी अचानक गोळीबाराचा थरार ऐकायला मिळाला. वनराज आंदेकर यांच्यावर पाच राऊंड फायर गेल्या. त्यांनी कसाबसा त्या फायर चुकवल्या. पण त्यांच्यावर टवाळखोरांनी कोयत्यांनी वार केले. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान वनराज यांचा मृत्यू झाला.
नाना पेठेत वनराज यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही समोर आलेय. त्यामध्ये १४ ते १५ हल्लेखोर दुचाकीवरुन आलेले दिसत आहे. हे हल्लेखोर तीन ते चार गाडीवर येतात अन् अचानक वनराज यांच्यावर हल्ला करतात. त्या हल्लेखोरांनी वनराज यांच्यावर गोळीबार (Pune Crime News) केला. त्यामधील काहीजण कोयता घेऊन अंगावर धावून गेले. त्यांच्यावर सपासप वार केले. या घटनेचे सीसीटीव्हीही पोलिसांना मिळालेय. पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास करत चार जणांना आतापर्यंत ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी पेठ येथे वनराज आंदेकर यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आल्या. पण त्यांना एकही गोळी लागली नाही. त्यांच्यावर धारधार शस्त्रांन हल्ला करण्यात आला होता, त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणाचे सीसीटीव्ही समोर आलेय. त्यामध्ये हल्लेखोर दुचाकीवरुन उतरुन कोयता घेऊन वनराज आंदेकर यांच्या दिशेन धाऊन जात असल्याचे दिसत आहे.
मास्टरमाईंड कोण ?
कौटुंबिक आणि संपत्तीच्या वादावरून पुण्यात वनराज आंदेकर यांचा खून करण्यात आला असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची रविवारी नाना पेठ परिसरात गोळीबार करून त्यांचा खून करण्यात आला. आत्तापर्यंत याप्रकरणी २ जणांना अटक केली आहे. त्यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम सध्या सुरू आहे.
वनराज यांच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून, त्यांच्याच दोन मुलींनी आणि २ मेव्हण्याच्या सांगण्यावरून हे कृत्य केलं आहे. आत्तापर्यंत १० आरोपी निष्पन्न झाले असून ४ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
पोलिासांनी तीन जणांना ठोकल्या बेड्या -
वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. यामध्ये सोमनाथ कोमकर, जयंत कोमकर, सोमनाथ गायकवाड यांचा समावेश आहे. दोन आरोपींना विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार आणि त्यांच्या पथकाने अटक केली. १३ ते १४ जणांनी वनराज वर हल्ला केला मात्र वनराज गोळीबारात नव्हे तर त्याच्यावर झालेल्या हत्याराने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. प्रॉपर्टीमधून झालेल्या वादातून हा प्लॅन केलेला हल्ला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.