मुंबई/पुणे

महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना छत्रपती शिवराय अन् बाळासाहेब ठाकरेंचा विसर; किशोरी पेडणेकर यांचा जोरदार हल्लाबोल

Kishori pendekar news : किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. सत्ताधाऱ्यांना छत्रपती शिवराय अन् बाळासाहेब ठाकरेंचा विसर पडल्याची टीका त्यांनी केलीय.

Saam Tv

मुंबई महापालिकेत राजकीय वातावरण तापलं

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची भाजपवर टीका

महापौर निवड आणि सभागृह व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई महापालिकेतील सत्तांतरानंतरच्या घडामोडींवर ठाकरे गटाच्या नेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. महापौर निवड, सभागृहातील व्यवस्था, पत्रकारांवरील निर्बंध आणि रोहिंग्या मुद्द्यावरून त्यांनी भाजपला लक्ष्य केले.

पेडणेकर म्हणाल्या की, राज्यात दोन वर्षे नऊ महिने प्रशासन राज्य सरकारच्या हातात होते. आता नगरसेवक म्हणून आम्ही सभागृहात आलो आहोत. महापौर निवडीसाठी लॉटरीचा निकष ठरवण्यात आला, मात्र त्यावेळी माध्यमांना बाहेर काढण्यात आले, हे अभूतपूर्व असल्याचा आरोप त्यांनी केला.

महिला आरक्षणामुळे भाजपच्या महिला उमेदवाराला संधी मिळाल्याचे त्यांनी मान्य केले, मात्र संपूर्ण प्रक्रिया ही “राजकीय ड्रामा” असल्याची टीका केली. ऋतू तावडे यांनी दिलेली उमेदवार मूळ काँग्रेसची असल्याचा टोला लगावत, “भाजप बाहेरून आलेल्यांना संधी देत आहे,” असा आरोप त्यांनी केला.

सभागृहातील बसण्याच्या व्यवस्थेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिवसेना 65 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर असूनही काँग्रेस सदस्यांना वर बसवण्यात आले. स्वीकृत 10 नगरसेवक येणार असताना त्यांना कुठे बसवणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “हे काम सेक्रेटरी विभागाचे आहे. बजेटच्या बैठकीवेळी सर्वांना सुटसुटीत व्यवस्था हवी, वयोमानानुसार गैरसोय होऊ नये,” असे त्या म्हणाल्या.

महापौरांचे भाषण लिखित असल्याची टीका करत, “मुंबईचे प्रश्न पाणी, गटार, पायाभूत सुविधांवर असताना फोकस रोहिंग्यांवर का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “मुंबई पोलीस महापौरांच्या अखत्यारीत येत नाहीत. रोहिंग्या शोधणे हे केंद्र सरकारच्या यंत्रणेचे काम आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, रोहिंग्या प्रश्नावर दर महिन्याच्या पहिल्या महापालिका बैठकीत केंद्र सरकारने किती रोहिंग्यांना शोधून कारवाई केली याचा लेखी जाब मागणार असल्याची घोषणा पेडणेकर यांनी केली. “दर महिन्याला किती रोहिंग्या सापडले आणि त्यांच्यावर काय कारवाई झाली, याची माहिती द्यावी,” अशी आमची मागणी असेल, असे त्यांनी सांगितले.

याशिवाय, सत्ताधाऱ्यांनी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख टाळल्याचा आरोप करत, “महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना त्यांच्या विचारांचा विसर पडला आहे,” अशी टीका त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुरंदरमध्ये शिक्षकांचे धरणे आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाविरोधात घोषणाबाजी

Lakshmi Niwas: 'लक्ष्मी निवास'मध्ये मोठा ट्विस्ट! लक्ष्मी-श्रीनिवासचे घराचे स्वप्न पूर्ण; तर जयंतचा होणार अखेर पर्दाफाश

Weekly Insulin: भारतात नवं इन्सुलिन लाँच! रोज नाही तर आठवड्यातून एकदाच घ्या इंजेक्शन, किंमत किती?

पावसाळ्याचा फिरायला जायचा प्लॅन करताय? पण, मुंबई-पुण्याजवळील 'ही' प्रसिद्ध पर्यटनस्थळे ३१ ऑगस्टपर्यंत राहणार बंद

Today Gold Rate : सुवर्णनगरीत सोन्याला झळाळी, चांदीलाही चकाकी; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT