sameer Wankhede/NavabMalik SaamTV
मुंबई/पुणे

'समीर वानखेडेंच्या केसालाही धक्का लागला तर...' सोमय्यांचा मलिकांना इशारा

परमबीर सिंह मातोश्रीत किंवा वर्षा बंगल्यातच असल्याचा आरोप.

अजय दुधाने

अंबरनाथ : समीर वानखेडे च्या केसाला ही धक्का लागला तर नवाब मलिकांची खैर नाही असा इशारा किरीट सोमय्यांनी नवाब मालिकांना दिला आहे .भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) अंबरनाथ मध्ये आज कार्यकर्ता मेळाव्यासाठी ते आले होते होते त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक Nawab Malik यांना इशारा दिला आहे.

हे देखील पहा -

मंत्री नवाब मलिक यांनी NCB अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना त्यांची नोकरी घालवू तसेच त्यानां तुरुंगात पाठवणार असल्याच वक्तव्य केल होतं शिवाय़ वानखेडे हा भाजपचा म्होरक्या आहे असं देखील मलिक म्हणाले होते त्यांच्या याच वक्तव्यावरती 'समीर वानखेडे च्या केसाला ही धक्का लागला तर नवाब मलिक यांची खैर नाही'. अशा शब्दात भाजप नेते किरीट सोमय्यांनी मलिकांना इशारा दिला आहे.

परमबीर सिंह मातोश्रीत किंवा वर्षा बंगल्यात -

तसेच परमबीर सिंह (Parambir Singh) मातोश्रीत किंवा वर्षा बंगल्यातच Varsha Bungalow असल्याचा आरोप देखील किरीट सोमय्या यांनी केला. केंद्राचे पोलीस आणि न्यायालय वर्षा बंगल्यात आणि मातोश्री Matoshri वर जाऊन तपास करू शकत नाही असं वक्तव्यं करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खळबळ उडवून दिली आहे. राज्य सरकार परमबीर सिंह यांना पाठीशी घालत आहे का? या प्रश्नावर सोमय्या यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ते आज भाजप कार्यकर्ता मेळाव्यासाठी अंबरनाथ Ambarnath येथे आले असताना त्यांनी महाविकास आघाडी वरती अनेक आरोप करत मलिकांना इशारा देखील दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

SCROLL FOR NEXT