''घोटाळा बाहेर काढायचो तेव्हा गायब व्हायचे, आता हॉस्पिटलमध्ये भरती होतात'' Saam Tv
मुंबई/पुणे

''घोटाळा बाहेर काढायचो तेव्हा गायब व्हायचे, आता हॉस्पिटलमध्ये भरती होतात''

भाजप नेत आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) कोल्हापूरला निघाले आहेत.

अश्विनी जाधव - केदारी

पुणे: भाजप नेत आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) कोल्हापूरला निघाले आहेत. मागच्या वेळेस त्यांना कोल्हापूरला जाण्यापासून रोखले होते. उद्या ते कोल्हापूरला दाखल होणार आहेत. आज ते पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले ''उद्या सकाळी महालक्ष्मी चे दर्शन घेऊन पोलीस स्टेशनमध्ये हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही घोटाळ्यांची तक्रार दाखल करणार आहे''. आता मला भीती एकाच गोष्टीची आहे, आधी मी घोटाळा बाहेर काढायचो तेव्हा ते गायब व्हायचे आता ठाकरे पवार सरकारमध्ये मी घोटाळा बाहेर काढला की हॉस्पिटलमध्ये भरती व्हायचं. आता मी घोटाळे बाहेर काढल्यावर 12 मंत्र्यांचा काय होणार, किती मंत्री हॉस्पिटलमध्ये भरती होणार? असा प्रश्न ही यावेळी किरीट सोमय्या यांनी विचारला आहे.

मागच्या वेळेस त्यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस देऊन कोल्हापूरात यायला बंदी घातली होती. यावेळी बोलताना सोमय्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे, ते म्हणाले ''उध्दव ठाकरेंना माझा सरळ प्रश्न आहे गेल्या वेळी गनिमी कावा कोणी केला? त्यांना अटक झाली का? उद्धव ठाकरे ही माहिती तुमच्याकडे होती ज्या आधारे तुम्ही मला कोल्हापूर बंदी केली होती. उध्दव ठाकरेंनी कबूल करावे की ते खोटं बोलत होते किंवा त्यांची नावं जाहीर करता येणार नाही हे सांगावं''.

आनंद अडसूळांना आलेल्या ईडीच्या नोटीबद्दल बोलताना सोमय्या म्हणाले अडसूळ आणि त्यांच्या मुलाने 900 कोटींचा गैरव्यवहार केला आहे. अडसूळांनी मिलिंद नार्वेकरांकडून शिकावं त्यांनी आपला बांगला स्वतः पाडला. संजय राऊतांकडून शिका चोरी का माल वापस कर दिया, तसंच अडसुळांनी पण करावं असा सल्ला त्यांनी बोलताना सोमय्यांनी दिला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tourism Place: मनमोहक दृश्ये अन् सुंदर नजारा; कोकणातील या गावात वाहने नाही तर दारासमोर होड्या केल्या जातात पार्क

IPL 2025 Auction, Players List: 574 खेळाडू लिलावाच्या रिंगणात! या 12 मार्की खेळाडूंवर असेल सर्वांचं लक्ष

Shani Dev: शनिवारी बांधा काळा धागा, शनिदोष होईल दूर

Maharashtra News Live Updates: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज येवला दौऱ्यावर

Gadchiroli News: गडचिरोलीत पोलिसांनी कट उधळला, पर्लकोटा नदीच्या पुलाजवळ बॉम्बस्फोट

SCROLL FOR NEXT