Kirit Somaiya- Sanjay Raut
Kirit Somaiya- Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

''संजय राऊतांनी मेधा सोमय्यांचे चारित्र्य हनन केले, माफी मागावी अन्यथा...''

Pravin

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात मागच्या अनेक दिवसांपासून आरोपांच्या फायरी सुरु आहेत. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर १०० कोटींचा टॉयलेट घोटाळा केल्याचा आरोप केला होता. आता किरीट सोमय्यांनी त्याला प्रतिउत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी माफी मागावी कारण त्यांनी मेधा सोमय्या यांचे चरित्र हनन केले आहे. मागचे २० दिवस झाले एकही कागद न देता आरोप करत आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) उद्धव ठाकरेंचे प्रवक्ते असल्याचा आरोप किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केले आहेत. संजय राऊतांनी माफी मागावी अन्यथा IPC ५००, ५०१आणि ५०६ वरुन कारवाई करावी लागेल.

एका पाठोपाठ एक आरोप राऊत करत आहेत. आता त्यांना धडा शिकवणार संजय राऊत यांना डेफिमेशनची (Defimation) नोटीस दिली आहे. ४८ तासात माफी मागावी लागेल असे किरीट सोमय्या म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांचे सरकार घोटाळे बाज आहे. संजय राऊत यांना माफी मागाविच लागेल असे किरीट सोमय्या म्हणाले आहेत. पुढे बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की पुढच्या आठवड्यात मुलुंड पोलीस स्टेशनला मेधा सोमय्या तक्रार दाखल करणार आहेत. विक्रांत निमित्त माझ्यावर राजद्रोहाचा आरोप लावला पण न्यायालयानं आम्हाला न्याय दिला. उद्धव ठाकरे यांना प्रश्न आहे की Eow ज्यांनी या संदर्भात तक्रार केली आहे त्यांना कधी बोलवणार चौकशीसाठी असा प्रश्न सोमय्यांनी विचारला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GT vs RCB, IPL 2024: RCB साठी 'करो या मरो'ची लढत! विजयासाठी गुजरातने ठेवलं २०१ धावांचं आव्हान

Morning Tips : सकाळच्या ५ सवयींमुळे अनेक आजारांपासून राहाल दूर; आज अवलंबा...

Cricket Records: वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारे फलंदाज

Today's Marathi News Live: पुण्यातील रेस कोर्स मैदानावर उद्या नरेंद्र मोदींची सभा

Gujarat News: 600 कोटींहून अधिक किमतीच्या ड्रग्जसह 14 पाकिस्तानी तस्करांना अटक, गुजरातमध्ये एनसीबीची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT