kirit somaiya & uddhav thackeray saam tv
मुंबई/पुणे

दोन्ही पत्रावर उद्धव ठाकरे कालच्या सभेत का बोलले; किरीट सोमय्यांचा सवाल

जो बायकोचा नाही होऊ शकला तो महाराष्ट्राचा काय होणार?; किरीट सोमय्यांची उद्धव ठाकरेंवर टीका केली.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : काल शिवसेनेची (Shivsena) सभा मुंबईत पार पडली या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपने नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली. या टीकेली आज किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ''जो बायकोचा नाही होऊ शकला तो महाराष्ट्राचा काय होणार, अशी बोचरी टीका सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठाकरे यांच्यावर केली आहे.

कल्याणमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात किरीट सोमैय्या बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी १९ बंगल्याच्या प्रकरणात २०१९ आणि २०२१ साली ग्रामपंचायतींना दोन पत्रं लिहिली. यातल्या पहिल्या पत्रात १९ बंगले आमच्या नावावर करा, अशी मागणी करण्यात आली. तर दुसऱ्या पत्रात तिथे बंगले नव्हते, असं रश्मी ठाकरे यांनी म्हटलं, असा आरोप किरीट सोमैय्या (Kirit Somaiya) यांनी केला.

ही दोन्ही पत्रं दाखवत यावर उद्धव ठाकरे कालच्या सभेत का बोलले नाहीत? असा सवाल किरीट सोमैय्या यांनी केला. तसंच ही दोन पत्रं लिहिणाऱ्या २ रश्मी ठाकरे आहेत? की उद्धव ठाकरेंच्या २ बायका आहेत? की एकाच रश्मी ठाकरेंनी दोन्ही पत्रं लिहिली आहेत? की उद्धव ठाकरेंनी ही पत्रं लिहिली आहेत? असा सवाल किरीट सोमैय्या यांनी केला. तसंच जो बायकोचा होऊ शकत नाही तो महाराष्ट्राचा काय होणार? अशी बोचरी टीकाही सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Poha Chivada: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी घरीच बनवा चटपटीत अन् कुरकुरीत पोहा चिवडा, रेसिपी एकदा वाचाच

Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय; राज्यातील दुकाने राहणार 24 तास खुली, कोणती दुकाने असतील बंद

Maharashtra Politics : गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत पोसलेली कुत्री; कुणी केली जहरी टीका?

Maharashtra Live News Update: मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणारच, पोलिसांची परवानगी

Ranveer Singh: या हॉरर चित्रपटाचा भाग होणार रणवीर सिंग, लवकरच होईल चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT