Kirit Somaiya Saam Tv
मुंबई/पुणे

"मुख्यमंत्री साहेब चुका होतात फक्त जनतेला सांगा की..."

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई - कोर्लई गावात रश्मी ठाकरेंच्या नावावर संपत्ती असून, त्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) केला होता. याबद्दल त्यांनी तक्रार केली असून, तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी ते आज कोर्लई गावात जाणार आहेत. किरीट सोमय्यआठ वाजता मुंबईतून अलिबागच्या दिशेने निघणार असून, कोर्लई ग्रामपंचायत, रेवदंडा पोलीस स्टेशन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला सोमय्या भेट देणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (Latest Political News In Marathi)

यावेळी ते म्हणले की, राज्याच्या जनतेला वास्तविक जाणून घ्यायची आहे. जानेवारी 2019 मध्ये ठाकरे सरकारने पत्र दिले. रश्मी उद्धव ठाकरे आणि मनिषा रवींद्र वायकर यांच्या नावाने घरे करावी असे पात्रात लिहिले होते.12 नोव्हेंबर 2020ला आर्टिजीएसने खात्यात पैसे ट्रान्सफर झाले असा आरोप सोमय्यांनी केला आहे.19 बंगलो उद्धव ठाकरे आणि वायकर परिवाराचे आहे.

हे देखील पहा -

मी ज्यावेळी आधी कोर्लई येथे गेलो तेव्हा त्या सरपंचानी असाच विरोध केला होता. घरे आहेत की नाही ही वास्तविकता लोकांना जाणून घ्यायची आहे. ही घरे चोरीला गेली की वाहून गेली हे जनतेला जाणून घ्यायचे आहे. या गैरव्यवहारचा मी सप्टेंबर 2020 पासून पाठपुरावा करत असल्याचे देखील यावेळी किरीट सोमय्या म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, ग्रामपंचायत कार्यालयात जी कागदे दिली आहे त्याचा एकदाही उद्धव ठाकरे यांनी विरोध केलेला नाही. साडे बारा कोटी जनतेला जाणून घ्यायचे आहे यासाठी मी कोर्लईला जात आहे. किरीट सोमया सामान्य आहे. साडे बारा कोटी जनतेचा एक सामान्य नागरिक जात आहे. अमरावती, कोल्हापूर आणि पुण्यात तर 100 गुंड आले होते तरी सोमय्या उभा आहे. आम्ही कुणीही आज दंगल करणार नाही. प्रशासन बोलले तुम्ही पुढे जाऊ शकत नाही तर मी त्यांच्या हातात पत्र देऊन येणार. मुख्यमंत्री साहेब चुका होतात फक्त जनतेला सांगा की मुख्यमंत्री असताना माझ्या बायकोचे बंगले चोरीला गेले मी सांभाळू नाही शकलो असे देखील ते यावेळी म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Kili Paul Dance : किली पॉलने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, 'लॉलीपाप लागेलू'वर जबरदस्त डान्स; हुकस्टेपने वेधलं लक्ष

Shahajibapu Patil : उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; काळ्या दगडावरची पांढरी रेघ, ५० खोक्यांवरून शहाजीबापू खवळले

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Navratri Special Dish: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

SCROLL FOR NEXT