मुंबई: तरुण पंजाबी गायक आणि कॉंग्रेस नेते सिद्धू मूसेवाला (Sidhu MooseWala) यांची २९ मे ला पंजाबच्या मानसा येथे गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) गॅंगने घेतली होती. याप्रकरणाता आता एक मोठी बातमी समोर आली आहे. सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येमागे खलिस्तान्यांचा हात असल्याचे पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येत पुणे कनेक्शनही समोर आले होते. यात संतोष जाधवसह महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप असलेल्या सौरव महाकाल याला पुणे (Pune) ग्रामीण गुन्हे शाखेने अटक केली आहे. सुरक्षा यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष जाधवची सौरव महाकालने लॉरेन्स बिष्णोई याच्याशी ओळख करून दिली होती. तेव्हापासून सौरव महाकाल आणि संतोष जाधव हे लॉरेन्स बिष्णोई टोळीसाठी राजस्थान आणि पंजाबच्या सीमेवर कार्यरत होते. सहा महिन्यांपूर्वी महाकाल याला राजस्थान पोलिसांनी दोनदा अटक केली होती. (The hand of Khalistan behind the murder of Sidhu MooseWala? Also connection of Pakistan's ISI?)
हे देखील पाहा -
संतोष जाधव आणि महाकाल हे ज्या लॉरेन्स बिष्णोई टोळीसाठी काम करत होते, तो लॉरेन्स बिष्णोई, हरविंदर सिंग उर्फ रिंदा (Harvinder Singh alias Rinda Sandhu) यांच्यासाठी भारतात काम करत होता. रिंदा देशातील सर्वात मोठा मोस्ट वॉन्टेड असलेला हरविंदरसिंग उर्फ रिंदा हा महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहे. हरविंदरसिंग उर्फ रिंदा हा गेल्या अनेक वर्षांपासून नांदेड येथे राहत होता आणि आसपासच्या परिसरात खंडणीचे पैसे उकळण्याचे किंवा खंडणी उकळण्याचे काम करत होता. सुरक्षा एजन्सींच्या माहितीनुसार, रिंदा २०१८ मध्ये भारत सोडून गेला होता. त्यानंतर तो लाहोर, पाकिस्तानमध्ये आला आणि आता त्याने पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI साठी काम करण्यास सुरुवात केली आहे.
पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) ने बब्बर खालसाची कमान ही रिंदा याच्याकडे सोपवल्याचे सूत्रांनी सांगितले. सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिष्णोई हरविंदर सिंग उर्फ रिंदा याच्याकडून भारतात कोणावरही हल्ला करण्याचे काम करायचे. या कारणास्तव, भारतातील शीख समुदायामध्ये फूट पाडण्यासाठी आणि अस्थिर करण्यासाठी रिंदा यांनी पाकिस्तानच्या आयएसआयच्या सांगण्यावरूनच लॉरेन्स बिष्णोई यांच्याकडे हे काम सोपवले असावे, असे आता भारतीय सुरक्षा यंत्रणांना वाटत आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.