Ketan Agrawal Murder Case: 5,053-page Chargesheet Reveals Alleged Conspiracy saam tv
मुंबई/पुणे

फेक अकाउंट, सोनम प्रकरण अन् तो सिनेमा; ५ हजार ५३ पानांचे दोषारोपपत्रातून केतन अग्रवाल प्रकरणाचा धक्कादायक खुलासा

Lohagad Ketan Agrawal Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात अहवालानुसार 5,053 पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या तपासात कथित कट, डिजिटल पुरावे, साक्षीदार आणि सोनम रघुवंशी प्रकरणाशी संबंधित ऑनलाइन सर्चची माहिती समोर आली आहे.

Bharat Jadhav

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या हाती या हत्येमागील नियोजनबद्ध कटाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात तीन आरोपींविरोधात तब्बल ५ हजार ५३ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपींनी सुरुवातीला केतनला अपंग करण्याचा प्रयत्न करण्याचा कट रचला होता. त्यानंतर परराज्यातील व्यक्तीच्या माध्यमातून त्याला गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न करण्याचे नियोजन करण्यात आले.

मात्र, बाहेरील व्यक्ती पकडली गेल्यास अडचण निर्माण होऊ शकते, या भीतीने हा निर्णय बदलण्यात आला. या कटाच्या संदर्भातील एका व्यक्तीला पोलिसांनी साक्षीदार केले आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, त्यानंतर आरोपींनी स्वतःच केतनचा खून करण्याचे ठरवले. यासाठी हत्येशी संबंधित चित्रपट पाहण्यासोबतच पोलिसांपासून कसे वाचता येईल, यासंदर्भातील पॉडकास्टही ऐकण्यात आले. तसेच मेघालयातील सोनम प्रकरणाचाही अभ्यास करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

लोहगडाची केली रेकी

मार्च २०२६ पासून या हत्येचा कट रचण्यास सुरुवात झाली होती. मे महिन्यात खुनाचा अंतिम प्लॅन करण्यात आला. मे महिन्याच्या अखेरीस सिया आणि चेतन लोणावळ्यात गेले होते. टायगर पॉईंटसह लोणावळ्यातील विविध डोंगर परिसरांची रेकी करण्यात आली. टायगर पॉईंटवर सीसीटीव्ही नसल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. मात्र, अखेर हत्येसाठी लोहगडाची निवड करण्यात आली. मार्च २०२५ मध्ये लोहगडावर एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे केतनचा डोंगरावर सेल्फी घेताना पाय घसरून मृत्यू झाल्याचा बनाव करता येईल, असा विचार आरोपींनी केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

पहिला प्रयत्न अपयशी

४ जून रोजी सियाने लोहगडावर जाण्याचा आग्रह धरला. बालीला जाण्यापूर्वीच केतनचा खून करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ६ जून रोजी प्री-वेडिंग शूटसाठी बालीला जाण्याचे नियोजन होते. मात्र, प्रवासादरम्यान सियाने खालापूरमधील एका कॅफेच्या वॉशरूममध्ये केतनचा पासपोर्ट फाडून टाकला. त्यामुळे बालीला जाणे शक्य झाले नाही.

यानंतर १४ जून रोजी सिया आणि केतन लोहगडावर गेले. यावेळी सियाने केतनला ढकलण्याचा प्रयत्न केला; मात्र तो पडला नाही. त्यानंतर सियाने ‘साप आला’ असा बनाव करून केतनला घाबरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातही त्यांना यश आले नाही.

फेक ‘माही’ अकाउंटचा वापर

हत्येचा कट पुढे नेण्यासाठी तिघांनी मिळून ‘माही’ नावाचे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार केले. या अकाउंटसाठी ओळखीच्या एका मुलीचा फोटो वापरण्यात आला. १८ जून रोजी या अकाउंटवरून सियाची मैत्रीण असल्याचे भासवून केतनशी संपर्क साधण्यात आला. सियाचा वाढदिवस लोहगडावर साजरा करून तिला सरप्राईज देण्याचे सांगून केतनला लोहगडावर आणण्याचे नियोजन करण्यात आले. हे संपूर्ण नियोजन रितेश हांगे करत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

पाठीमागून धक्का देत केतनला दरीत ढकलले ठरलेल्या नियोजनानुसार चेतन चौधरी हा गडावर जाणाऱ्या दुसऱ्या मार्गाने वर गेला आणि गडावरील मंदिरात जाऊन बसला. त्यानंतर सियाने त्याला खुणावून वर जाण्यास सांगितले. केतनचे लक्ष नसताना सियाने त्याच्या पाठीमागून खांद्याला धक्का दिला, तर चेतनने पायाला धक्का दिला. त्यानंतर चेतनने लाथ मारल्याने केतन खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.या संपूर्ण हत्येचा कट रितेश हांगे याने रचल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले आहे. खून केल्यानंतर ‘माही’ नावाचे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट डिलिट करण्यात आले.

५ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार; ५,०५३ पानी दोषारोपपत्र

या प्रकरणात पोलिसांनी पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. तसेच दोषारोपपत्रात कटाची आखणी, आरोपींच्या हालचाली, रेकी, बनावट सोशल मीडिया अकाउंट आणि हत्येपूर्वीचे नियोजन यासंदर्भातील माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील दोषारोपपत्र तब्बल ५ हजार ५३ पानांचे आहे.

या प्रकरणामुळे नियोजनपूर्वक हत्या करण्यासाठी सोशल मीडिया, चित्रपट आणि इंटरनेटवरील उपलब्ध माहितीचा वापर कशा पद्धतीने करण्यात आला, याची धक्कादायक बाब तपासातून समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: IIT मुंबईतील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर कॅम्पसमध्ये संतापाचं वातावरण

डेंग्यूचा खेळ पुढच्या वर्षी खल्लास, डेग्यूवर मिळाली जपानी संजीवनी

'मातोश्री' बाहेर नोटीशीचा हायव्होल्टेज ड्रामा, दिशाच्या वडिलांची आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस

Maratha Reservation: जुन्या नोंदी, कागदपत्रांच्या अडचणींवर तोडगा निघाला; मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

बळीराजाच्या डोळ्यांत अश्रू, मंत्र्यांना बदाम-काजू, दुष्काळाच्या बैठकीत नेते-अधिकाऱ्यांना मेजवानी

SCROLL FOR NEXT