Kedar Jadhav's Father found
Kedar Jadhav's Father found Saam tv
मुंबई/पुणे

Kedar Jadhav's Father found: क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील सापडले; सकाळपासून झाले होते बेपत्ता

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune News : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधव याचे वडील पुण्यातून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. केदार जाधव याचे वडील महादेव जाधव हे पुण्यातून बेपत्ता झाले होते. मात्र, पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर केदारचे वडील हे मुंढवा परिसरात सापडले आहेत. (Latest Marathi News)

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधव याचे वडील पुण्यातील (Pune) कोथरूड भागातून बेपत्ता झाले होते. महादेव जाधव असे केदारच्या वडिलांचे नाव आहे. केदारचे वडील पुण्यातील कोथरूड भागातून आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास पासून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, केदार जाधव याचा परिवार कोथरूड भागात राहायला आहे. महादेव जाधव यांनी आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी रिक्षा घेऊन गेले होते. त्यांच्या जवळ असलेला फोन सुद्धा बंद लागत होता. त्यामुळे पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

केदार जाधवचा जन्म २६ मार्च १९८५ रोजी पुण्यात झाला. त्याच्या वडिलाचे नाव हे महादेव जाधव आहे. केदारचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील जाधववाडी आहे. महादेव जाधव हे १९८० साली सोलापुरातून पुण्यात स्थायिक झाले होते. महादेव जाधव हे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात लिपिक होते.

केदारचे वडिल २००३ साली सेवानिवृत्त झाले. केदारचे वडील महादेव जाधव हरविल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी रिक्षा घेऊन गेले, त्यानंतर घरी परतलेच नव्हते. मात्र, पोलिसांना महादेव जाधव हे मुंढवा परिसरात सापडले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा 'या' कारला आहे मागणी

SCROLL FOR NEXT