पिंडदान घालत KDMC चे वर्षश्राद्ध; अनधिकृत बांधकामांविरोधात केले अनोखे आंदोलन... प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

पिंडदान घालत KDMC चे वर्षश्राद्ध; अनधिकृत बांधकामांविरोधात केले अनोखे आंदोलन...

प्रदीप भणगे

डोंबिवली: अनधिकृत बांधकामांच्या (illegal Construction) विरोधात आणि केडीएमसी (KDMC) अधिकाऱ्यांच्या विरोधात डोंबिवलीतील (Dombivali) सामाजिक कार्यकर्ते (Social Worker) महेश निंबाळकर यांनी पिंडदान घालत आणि महापालिकेचे वर्षश्राद्ध करत अनोखे आंदोलन (Unique Agitation) केले आहे. डोंबिवलीमधील सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर हे गेले वर्षाभर अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या केडीएमसी अधिकाऱ्यांच्या विरोधात गेले वर्षभर लढा देत आहेत. (KDMC's funeral year and Pindana; Unique agitation against unauthorized construction)

हे देखील पहा -

अनधिकृत बांधकामाबाबत त्यांनी आयुक्तांकडे  वारंवार पाठपुरावा करून सुद्धा त्याना कोणतेही उत्तर मिळाले नाही, ना केडीएमसीला अनधिकृत बांधकाम रोखण्यात यश आलं. त्यामुळे अखेर आज आंदोलनाचे ३६५ दिवस पूर्ण होताच निंबाळकर यांनी पिंडदान करत, पालिकेचे वर्षश्राद्ध घातले आहे. तसेच आयुक्तांनी काढलेले आदेशाला कशी केराची टोपली दाखवली जाते हे देखील निंबाळकर यांनी सांगितले. आयुक्तांनी साधारण दोन महिन्यांपूर्वी प्रसार माध्यमांना सांगत आदेश काढले होते की, अनधिकृत बांधकामांना नळ जोडण्या दिल्या जाणार नाहीत. तसेच महावितरणला देखील पत्र दिले होते की, अश्या बांधकामांना वीजपुरवठा देऊ नये. मात्र नळ जोडण्या दिल्या जातात आणि महावितरणचे अधिकारी सांगतात की आयुक्त आमचे मालक नाहीत, असे सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अनधिकृत बांधकाम आजदेखील सर्रास सुरू असल्याचे निंबाळकर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या आंदोलनानंतर तरी केडीएमसीचे आयुक्त आणि अधिकारी याकडे लक्ष घालणार का ? निंबाळकर यांना न्याय देणार का? हे पाहावे लागेल.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: आमदार भारती लवेकर समर्थनार्थ कार्यकर्त्यांची सोशल माध्यमातून पोस्टरबाजी

VIDEO : स्वार्थासाठी झालेल्या 'आघाडी' बिघाडी होणारच; एकनाथ शिंदेची मविआतील वादावर टीका !

Tasgaon Vidhan Sabha : तासगावमध्ये होणार घड्याळ- तुतारीत काट्याची लढत; भाजपचे नेते घड्याळ घेऊन उतरणार मैदानात

Health Tips: टोमॅटो आणि काकडी एकत्र खाताय? त्या आधी हे वाचा...

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे अँजिओप्लास्टीनंतर पहिल्यांदाच समोर, एक शब्द अन् कार्यकर्त्यांमध्ये भरला उत्साह; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT