MNS leader Raju Patil addressing the media on MNS support to Shinde Sena in Kalyan-Dombivli Municipal Corporation. saam tv
मुंबई/पुणे

KDMC Politics: मनसेनं शिंदे सेनेला का दिला पाठिंबा? राजू पाटलांनी सांगितली सत्ताकारणाची Inside Story

KDMC Politics MNS–Shinde Sena Alliance: मनसेने शिंदे सेनेला पाठिंबा दिल्याने केडीएमसीच्या राजकारणात नाट्यमय वळण आलंय. त्यामुळे शिंदे गटाच्या महापौरपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान मनसे नेते राजू पाटील यांनी नव्या युतीची आतली बातमी सांगितली आहे.

Bharat Jadhav

  • केडीएमसीमध्ये मनसेच्या पाठिंब्यामुळे शिंदे गट सत्तेत

  • भाजपला मोठा राजकीय धक्का

  • मनसे–काँग्रेस–शिंदे सेना युतीचं वेगळं समीकरण

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेमध्ये युतीचं अगळं-वेगळं गणित मांडत सत्ता प्रश्न मिटलाय. मनसेच्या पाठिंब्यामुळे या महानगर पालिकेत शिवसेना शिंदेगटाचा महापौर होणार आहे. मनसे आणि काँग्रेसशी युती साधत कल्याण-डोंबिवलीमध्ये शिंदे गटाने भाजपला धक्का दिलाय. कल्याण-डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेना राज ठाकरेंच्या मनसेकडून पाठिंबा मिळालाय. दरम्यान महानगर पालिकेत भाजप आणि शिंदे गटाविरोधात हल्लाबोल करणाऱ्या मनसेनं शिंदे सेनेला पाठिंबा कसा दिला.

या राजकारण घडलं याची संपूर्ण माहिती मनसे नेते राजू पाटील यांनी दिलीय. गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीत पळवापळवीचा खेळ सुरू होता. ही परिस्थिती थांबताना दिसत नव्हती. भविष्यात समित्यांच्या निवडणुका आहेत, त्यावेळीही गोंधळ होण्याची शक्यता होती. त्यामुळे कुठेतरी स्थिरता, यावी या हेतूने आम्ही शिंदेसेनेला पाठिंबा दिलाय. शिंदेसेना-भाजपा एकत्र लढलेत. जनतेच्या हितासाठी आम्ही त्यांना समर्थन देत असल्याचं राजू पाटील म्हणाले.

कोकण भवनात नगरसेवकांची गट नोंदणी केल्यानंतर राजू पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कल्याण-डोंबिवलीमधील सत्तेचं राजकारण कसं घडलं याची माहिती दिली. आम्हाला काही भेटण्याऐवजी सत्तेत असल्याने विकासाची कामे होतील यासाठी आम्ही पाठिंबा दिला. आम्ही उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबत युतीमध्ये लढलो. निकालानंतर काही नगरसेवक गायब झाले, त्यामुळे आम्हाला आमच्या नगरसेवकांचीही चिंता होती. त्यांच्याही नगरसेवकांची चिंता होती. जनता पळवापळवीच्या राजकारणाला कंटाळली होती.

हे थांबावे म्हणून आम्ही पाठिंबा दिला आहे. कोणत्याही स्वार्थासाठी घेतलेला हा निर्णय नाही. आम्ही ठामपणे समोर आलो. जेव्हा आमचे निकाल समोर आले आणि आम्ही येथील गणित राज ठाकरेंना सांगितले. त्यावेळी त्यांनी स्थानिक पातळीवर जो निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल तो घ्या असं सांगितले. त्यानुसार आम्ही निर्णय घेतला आहे असं पाटील यांनी सांगितले.

भाजपा-शिंदेसेना एकत्र आहेत, मग भाजपला बाजूला ठेवायचा प्रश्न नाहीये. ५ नगरसेवकांमध्ये आम्ही सत्तेच्या बाहेर राहून जनतेला न्याय देऊ शकलो असतो का? त्यामुळे सत्तेत राहून आम्ही अंकुश ठेवू शकतो. भलेही आम्ही त्यांची सत्ता पाडू शकत नाही मात्र आमचे जे मुद्दे आहेत, किमान समान कार्यक्रम घेऊनच आम्ही पुढे जात आहोत, असेही राजू पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: धारदार शस्त्रानं आधी पोट फाडलं, नंतर गुप्तांग कापून झाडाला लटकवलं; महिलेने बॉयफ्रेंडला दिला भयानक मृत्यू

'लेडी बॉस'च्या मृत्यूचं गूढ उलगडलं; कर्मचाऱ्यानेच पेट्रोलने टाकून जाळलं अन् रचला अपघाताचा बनाव, धक्कादायक कारण समोर

लेकाने आईला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, दोघांनी मुलाला छतावरून फेकलं, कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

Maharashtra Live News Update: माकपचं आंदोलन स्थगित होणार?

Thursday Horoscope: रागावर नियंत्रण ठेवा, 5 राशींसाठी सुखाचा दिवस; कामात बढतीचे योग, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT