अभिजीत देशमुख, साम प्रतिनिधी
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून बाह्यवळण रस्ता प्रस्तावित करण्यात आलाय. कल्याण टिटवाळा 27 गावांसह डोंबिवली जोडणाऱ्या या रस्त्यातील अडथळे काढत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे. आज या रस्त्यातील टप्पा क्रमांक पाच अटाळी येथील बाधित होणाऱ्या 565 घरांपैकी 319 घरे या पूर्वीच तोडण्यात आलीत.
तर आज 118 घरांवर हातोडा मारत रस्त्याचा मार्ग मोकळा करण्यात आलाय. उर्वरीत घरांच्या बाबतीत चर्चा सुरू असून त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया लवकरच पूर्ण करत ही घरे देखील ताब्यात घेण्यात येणार आहेत. यासर्व बाधितांचे पुनर्वसन शासनाच्या बाधितांचे पुनर्वसन प्रकल्पाच्या घरांमध्ये करण्यात आल्याचे पालिका उपायुक्त गणेश बोरकर यांनी सांगितले .
कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडी फोडण्याबरोबरच शहरातील कोणत्याही व्यक्तीला कमीत कमी वेळेत शहराबाहेर पडणे शक्य व्हावे यासाठी रिंगरोड प्रस्तावित करण्यात आला आहे. केडीएमसीमधील रिंग रोडचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून केले जात आहे. रिंगरोड रस्त्यामधील बाधितांना मोबदला ,पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघत नसल्याने या रिंगरोडचे काम रडत-खडत सुरू आहे. रिंगरोड चार ते सातमधील टप्पा क्रमांक पाच चे काम शिल्लक आहे.
कल्याण ते टिटवाळा या 4 ते 7 व्या टप्प्यातील रिंगरोड रस्त्याच्या कामात बाधीत होणार्या बांधकामामुळे रस्त्याचे काम रखडले होते. या बाधितांच्या पुर्नवसनाचा प्रश्न सोडवण्यात केडीएमसीला यश आलं आहे .त्यामुळे दुर्गाडी ते टिटवाळा मार्ग दृष्टीक्षेपात आला आहे .या मार्गातील अटाळी येथील रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कल्याण ते टिटवाळा हे अंतर अवघ्या वीस मिनिटांवर येणार आहे .यामुळे हा रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
या रस्त्यात अटाळी येथील 565 बांधकामे बाधित होत आहेत यातील 319 घरे यापूर्वी तोडण्यात आली आहे.केडीएमसीच्या पथकाने आज उर्वरित 118 घरांवर तोडक कारवाई सुरू केली. याबाबत केडीएमसी चे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी सांगितले की रिंग रोडमधील बाधित 118 घरांवर तोडक कारवाई सुरू केली आहे. या रूमधारकांचे पर्यायी पुनर्वसन महापालिकेने केडीएमसीचे बाधितांच्या पुनर्वसन धोरण अंतर्गत केलं आहे,या ठिकाणची उर्वरित बांधकामे देखील लवकरच निष्कसीत करत या मार्गातील अडथळे दूर करत कल्याण ते टिटवाळा दरम्यानच्या रस्त्याचे काम लवकरात लवकर ते काम पूर्ण करून हा रस्ता करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.