KDMC Politics Saam Digital
मुंबई/पुणे

kalyan Dombivli : कल्याण डोंबिवली महापालिकेचा गलथान कारभार; लाभार्थ्यांना चाव्या मिळूनही घराचे स्वप्न अपूर्णच, कारण काय?

kalyan Dombivli News : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 461 प्रकल्पबाधितांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकत्याच घरांच्या चाव्या देण्यात आल्या. यामुळे लाभार्थ्यांची घरांची प्रतीक्षा संपल्याचे बोलले जात होते.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, कल्याण

Kalyan Dombivali News :

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 461 प्रकल्पबाधितांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकत्याच घरांच्या चाव्या देण्यात आल्या. यामुळे लाभार्थ्यांची घरांची प्रतीक्षा संपल्याचे बोलले जात होते. मात्र प्रत्यक्षात अद्यापही त्यांच्या घराचे स्वप्न अपूर्णच राहिल्याचं उघड झालं आहे.

घराच्या चाव्या मिळाल्याने आनंदित झालेल्या लाभार्थ्यांनी मिळालेल्या घरांची पाहणी केली असता त्यांना धक्काच बसला. काही घरांमध्ये आधीच कोणीतरी राहत असल्याचे दिसून आले तर काही घरांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे त्यांना पाहायला मिळाले. त्यामुळे ही घरे देताना घरांचा सर्व्हे महापालिकेने केला नाही का, असा सवाल आता लाभार्थ्यांनी उपस्थित केला. (Latest Marathi News)

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात केंद्र शासनाच्या माध्यमातून ‘बीएसयूपी’ योजना राबवण्यात आली होती. महापालिका प्रशासनाने या योजनेच्या माध्यमातून सुमारे सात हजार घरं तयार केले. यामधील सुमारे 1800 लाभार्थ्यांना घरांचे वाटप करण्यात आले. मात्र उर्वरित लाभार्थी पुरावा देऊ न शकल्यामुळे घरांचे वाटप तांत्रिक अडचणीत सापडले आहे. उर्वरित घरे राज्य सरकारच्या माध्यमातून प्रकल्प बाधितांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

रिंगरोडसह 29 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पबाधितांना या योजनेतील घरांच्या चाव्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते नुकत्याच देण्यात आल्या. त्यामुळे रिंग रोड प्रकल्प मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली तर प्रकल्पबाधितांना देखील घरांचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद होता.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डोंबिवली पूर्वेकडील आंबेडकर नगर, कल्याण पश्चिमेकडील इंदिरानगर, उंबर्डे येथील बीएसओपी प्रकल्पात लाभार्थ्यांचे पुनर्वसन करण्यात आले. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चावा मिळाल्याने आनंदी झालेल्या लाभार्थ्यांनी संबंध ठिकाणी जाऊन घरांची पाहणी केली. तेव्हा त्यांना धक्का बसला काही लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या घरामध्ये आधीच कोणीतरी राहत असल्याचे निदर्शनास आले . तर काही लाभार्थ्यांच्या घरांची अवस्था अत्यंत दैन्य होते. घरांच्या दरवाजा खिडक्या तुटलेल्या होत्या. घरातली वायरिंग उखडून चोरी झालेली होती, तर लिफ्ट देखील चोरीला गेल्या होत्या.

कल्याण पश्चिमेकडील बिर्ला कॉलेज इंदिरानगर परिसरातील नागरिकांनी तर या लाभार्थ्यांना घरांचा ताबा घेण्यापासूनच विरोध केला. यामुळे या लाभार्थ्यांच्या आनंदावर अवघ्या काही तासात पुन्हा एकदा पाणी फिरले. लाभार्थ्यांनी याबाबत महापालिका प्रशासनाकडे संपर्क साधला असता प्रशासनाकडून याबाबत चौकशी करण्यात येईल, असा आश्वासन लाभार्थ्यांना देण्यात आलं आहे. लाभार्थ्यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.

आम्हाला चाव्या देताना महापालिकेने त्या घरांचा सर्व्हे केला नव्हता का? कोणाचा तरी कब्जा असलेली तुटकी फुटकी घरे आमच्या माथी का मारली, मुख्यमंत्र्यांना दाखवण्यापुरता चाव्या देण्याचा कार्यक्रम केला का? असा सवाल आता लाभार्थ्यांकडून केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT