kalyan dombivali building scam saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Dombivli : ६५ अनधिकृत इमारत प्रकरणानंतरही KDMC मध्ये बेकायदा बांधकामांचे रजिस्ट्रेशन सुरूच; ठाकरे गटाचा गंभीर आरोप

KDMC News : ६५ बेकायदा इमारत प्रकरण ताजे असताना रजिस्ट्रेशन कार्यालयात बनावट कागदपत्रांच्या आधारे अनधिकृत बांधकामांमधील घरांचे रजिस्ट्रेशन सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केला आहे.

Yash Shirke

अभिजीत सोनावणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

कल्याण डोबिंवलीमधील ६५ बेकायदा इमारती बांधकाम प्रकरणी उच्च न्यायालयाने इमारती बेकायदा असल्याचे सांगत कारवाईचा पहिला आदेश दिला. त्या आदेशानंतरही साई गॅलेक्सी या इमारतीमधील एका फ्लॅटचे रजिस्ट्रेशन झाले इतकेच नव्हे तर गेल्या दोन महिन्यापासून डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामाचे रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये खोट्या कागदपत्रांच्या आधारे रजिस्ट्रेशन सुरू असल्याचा धक्कादायक आरोप ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केला आहे.

ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी आज डीसीपी अतुल झेंडे यांची भेट घेतली. '६५ बेकायदा इमारत प्रकरणात हजारो नागरिकांची फसवणूक झाल्यावरही आज देखील फसवणूक सुरु आहे. ६५ बेकायदा इमारत प्रकरणातील मागचा जे आका आहे त्याला शोधा' अशी मागणी जिल्हाप्रमुख म्हात्रे यांनी केली.

'जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात काही बेकायदा बांधकामातील घरांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. गँग्स ऑफ डोंबिवली या मागे आहे. कागदपत्र तयार करणारे मोठे स्कॅमर आहे. या प्रकरणाचा तपास डीसीपींनी करावा या प्रकरणी पोलिस आयुक्तांचीही भेट घेणार आहे. ज्या लोकांच्या विरोधात या प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. तेच लोक या रजिस्ट्रेशन घोटाळ्यात आहेत', असे म्हात्रे यांनी म्हटले आहे.

आजही रजिस्ट्रेशन कार्यालयात अधिकृत इमारतीचे पेपर लावून अनधिकृत इमारतीमधील घरांचे रजिस्ट्रेशन सुरु आहे. रजिस्टेशन करण्यासाठी तीन लाख रुपये घेतले जात आहेत. त्याच्या मागे कोण आहे. त्याचा तपास डीपीसींनी करावा. त्यासाठी एसआयटी नेमावी. या संदर्भात जे पुरावे सादर केल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chaturgrahi Yog: बुधाच्या गोचरमुळे तयार होणार चतुर्ग्रही योग; या राशींच्या आयुष्यात येणार पैसाच पैसा

Maharashtra Live News Update: आता कुठलाच वेगळा ब्रँड शिल्लक नाही - सामंत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ₹३००० येणार, २९ महापालिका निवडणुकीआधी महायुती डाव टाकणार?

VitaminD Risk: Vitamin D च्या अतिसेवनाने थेट किडनीवर परिणाम, डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा, वाचा

Mumbai Local: गुड न्यूज! मुंबईत धावणार स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन एसी लोकल, केंद्र सरकराचा जबरदस्त प्लान

SCROLL FOR NEXT