Kalyan Dombivli Municipal Mayor News Saam Tv
मुंबई/पुणे

KDMC Mayor : कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेचा महापौर कोण होणार? शिंदेंच्या या २ शिलेदारांची चर्चा

Kalyan Dombivli Municipal Mayor News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीचा निकाल जवळपास निश्चित झाला आहे.

Alisha Khedekar

  • केडीएमसी महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल

  • शिवसेना-भाजप युतीचे नेतृत्व जवळपास निश्चित

  • नव्या नेतृत्वाखाली शहर विकासाला गती मिळेल, असा विश्वास

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

राज्यात महापालिका निवडणुका होऊन आठवडा उलटून गेला असला तरी अद्यापही २८ महापालिकांपैकी २८ पालिकांवर कोणत्याही पक्षाचा महापौर बसलेला नाही. मात्र अकोल्यातील महापालिकेच्या खुर्चीत भाजपचा पहिला उमेदवार विराजमान झाला आहे. अशातच आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, या दोन्ही पदांचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे.

महापौर पदासाठी शिवसेनेच्या ॲड. हर्षाली थविल चौधरी तर उपमहापौर पदासाठी भाजपकडून राहुल दामले यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. हे उमेदवारी अर्ज शिवसेना–भाजप तसेच मनसेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आले. यावेळी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, मनसे नेते राजू पाटील, भाजपचे नाना सूर्यवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. मात्र दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने, या महत्त्वाच्या पदांवरील निवडणुकीचा निकाल जवळपास निश्चित झाला आहे. त्यामुळे येत्या ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेतील निवडणूक प्रक्रिया ही केवळ औपचारिकता ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले असून, नव्या महापौर आणि उपमहापौरांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला आणखी गती मिळेल, असा विश्वास खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pawar Family: मोठी बातमी! पवार कुटुंब एकत्र येणार? आज किंवा उद्या पवार कुटुंबीय निर्णय घेणार?

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? मुख्यमंत्र्यांसोबत नेमकं काय बोलणं झालं, प्रफुल्ल पटेलांनी सगळंच सांगितलं

Women Yoga Poses: हाडांच्या मजबुतीसाठी महिलांनी करा 'हे' 5 योगा, पन्नाशीनंतरही राहाल फिट

Maharashtra Live News Update: केडीएमसी महापौर पदासाठी रस्सीखेच

Shocking : नवऱ्याचा 'तो' शब्द जिव्हारी लागला, मॉडेलनं बेडरूममध्येच...; दरवाजा उघडताच समोर दिसलं भयंकर दृश्य

SCROLL FOR NEXT