KDMC Mayor Bungalow News Saam Tv
मुंबई/पुणे

KDMC News : अरेरे! कल्याण डोंबिवली महापौर बंगल्याची वाईट अवस्था; केडीएमसीच्या दुर्लक्षामुळे जनतेच्या करोडो रुपयांची उधळपट्टी

Kalyan Dombivli Mayor Bungalow News : केडीएमसीच्या महापौर निवासस्थानाची दुरवस्था पुन्हा चर्चेत आली आहे. कोट्यवधी खर्चून बांधलेला बंगला वर्षानुवर्षे बंद असून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे जनतेच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा आरोप होत आहे.

Alisha Khedekar

  • केडीएमसी महापौर बंगला अनेक वर्षांपासून वापराविना बंद

  • कोट्यवधी खर्च असूनही देखभाल नाही

  • वाळवी व जीर्ण अवस्थेमुळे पुन्हा दुरुस्तीचा खर्च वाढणार

  • प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे जनतेच्या पैशांचा अपव्यय

  • नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

मागील महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणूका पार पडल्या. महापौर खुर्चीच्या चढाओढीच्या स्पर्धेत पुन्हा महायुतीनेच बाजी मारली. मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत शिवसेना आणि भाजपची जोरदार लढत रंगली. मुंबई महानगरपालिकेचा महापौर पदाचा दावेदार अद्याप निश्चित झाला नसला तरी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा महापौर ठरला आहे. मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर निवासस्थानाची दुरवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

२०१० साली जनतेचे लाखो रुपये खर्च करून हे महापौर निवासस्थान बांधण्यात आले होते. मात्र, रस्त्यांच्या वादग्रस्त कारणांमुळे हे निवासस्थान सुरुवातीपासूनच चर्चेत राहिले. बांधकामानंतर अनेक वर्षे हा बंगला वापराविना ओस पडून होता.यानंतर पुन्हा लाखो रुपये खर्च करून बंगल्याची डागडुजी करण्यात आली.

मात्र, तत्कालीन महापौरांनी केवळ बंगल्याची पूजा करून त्यामध्ये वास्तव न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा हा बंगला वापरात आला नाही. कोरोना काळापासून तर हा बंगला पूर्णपणे बंद अवस्थेत असून, देखभालीअभावी त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. सध्या बंगल्यातील संपूर्ण लाकडी फर्निचर खराब झाले असून, अनेक ठिकाणी वाळवीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. नियमित देखभाल व संरक्षण न केल्यामुळे महापौर निवासस्थानाची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली आहे.

केडीएमसी प्रशासनाने या बंगल्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने पुन्हा एकदा दुरुस्तीसाठी जनतेच्या लाखो रुपयांची उधळपट्टी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नवनिर्वाचित महापौर हर्षाली थविल यांनी पालिका अधिकाऱ्यांसह या निवासस्थानाची पाहणी केली आहे. पाहणीनंतर या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी पुन्हा निधी खर्च करावा लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे जनतेच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahanu : १६व्या शतकातील 'हा' किल्ला आजही आहे जिवंत, तुम्ही कधी पाहिलाय का?

Black Tea for High Blood Pressure: उच्च रक्तदाबाचा त्रास असलेले रूग्ण ब्लॅक टी पिऊ शकतात का?

Vinod Kambli : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी वृद्धाश्रमात, अवस्था पाहून चाहते इमोशनल; Video व्हायरल

Maharashtra News Live Update: पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला २४ तास पूर्ण

Famous Actor : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावाला लाच घेताना रंगेहात पकडलं, पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT