Kalyan KDMC Saam Tv News
मुंबई/पुणे

Kalyan Domivali: KDMCच्या 'त्या' ६५ इमारतींवर टांगती तलवार; ठाकरे गट आला धावून, रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा

Fake documents housing scam KDMC: शिवसेना ठाकरे गटाने बेघर कुटुंबांना पाठिंबा दर्शवलाय. साडे सहा हजार कुटुंबांना बेघर होऊ देणार नाही, त्यांच्या घरांवर कारवाई होऊ देणार नाही, असं म्हात्रे म्हणाले.

Bhagyashree Kamble

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

केडीएमसीच्या अनधिकृत इमारतींवर मनपा कायदेशीर कारवाई करत असताना नागरिकांच्या राहण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. न्यायालयाच्या आदेशानंतर केडीएमसी क्षेत्रातील त्या ६५ इमारतींवर कारवाईची टांगती तलवार आहे. संबंधित रहिवाशांना इमारात रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाने बेघर कुटुंबांना पाठिंबा दर्शवलाय. 'साडे सहा हजार कुटुंबांना बेघर होऊ देणार नाही, त्यांच्या घरांवर कारवाई होऊ देणार नाही', असं ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे म्हणालेत.

इमारतींमधील रहिवाशांचा मेळावा आणि पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी बेघर कुटुंबाला पाठिंबा दर्शवला आहे. 'घरांवर कारवाई होऊ देणार नाही. या प्रकरणी आदित्य ठाकरेंसह उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत', असे ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितलंय.

'ज्यांची फसवणूक झाली त्यांच्यावर कारवाई, मात्र ज्यांनी फसवणूक केली त्यांच्यावर कारवाई नाही, हा कोणता न्याय?; असा सवालही म्हात्रे यांनी उपस्थित केलाय. 'ज्या कथित बिल्डरांवर गुन्हा दाखल झाले ते बिल्डर नाहीत, सूत्रधार दुसरेच आहेत, खोटे कागदपत्र बनवले, खोटे कागदपत्रांच्या आधारे रजिस्ट्रेशन केलं. शासनाचे फसवणूक केली. मात्र, याप्रकरणी खोटी कागदपत्र बनणार्‍यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.

'या प्रकरणात ६५ बिल्डरांची यादी दिली ते खरे बिल्डर नाही, डमी उभे केले आहेत, या यादीत प्रत्यक्ष त्या बांधकाम साइटवर काम करणारे इलेक्ट्रिशन, प्लंबर, लेबर यांची नावे आहेत. त्यांची बांधकाम व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नाही. हे मोठे रॅकेट आहे ,या रॅकेटला राजकीय वरदहस्त आहे. ते उघड झालेच पाहिजे, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे.

'या रहिवाशांच्या पाठीशी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष खंबीरपणे उभा राहील या लोकांवर कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी रस्त्यावर उतरून लढाई लढू, त्याच बरोबर न्यायालयीन लढाई देखील लढू', असा इशाराही म्हात्रे यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

Kharadi Name History: खराडी हे नाव कसं पडलं? वाचा पुण्यातील प्रसिद्ध शहाराचा जुना इतिहास

Face Shape : तुमचा चेहरा कोणत्या आकाराचा? ही ट्रिक वापरा अन् लगेच ओळखा

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

अंमली पदार्थ अन् २ बायका, फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी; खडसेंच्या जावयाला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं | VIDEO

SCROLL FOR NEXT