eknath shinde saam tv
मुंबई/पुणे

Mahapalika Election : ठाकरे बंधू युतीची घोषणा करण्याआधीच बालेकिल्ल्यात महायुतीची घोषणा, २ दिवसात जागावाटप

KDMC election seat sharing Mahayuti : ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या घोषणेला आधीच शिंदे गट आणि भाजपकडून महायुतीचे संकेत मिळाले आहेत. केडीएमसी निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असून पुढील दोन दिवसांत ठोस निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

संघर्ष गांगुर्डे, सा टीव्ही प्रतिनिधी

Kalyan Dombivli municipal corporation elections Mahayuti : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमुळे राज्यातील नव्या राजकीय युतीची चर्चा सुरू झाली आहे. पण ही घोषणा होण्याआधीच शिंदेंच्या बालेकिल्ल्यात महायुतीची घोषणा झाली आहे. मंगळवारी रात्री कल्याण डोंबिवली महापालिकेतील महायुतीची स्थानिक पातळीवर महायुतीवर चर्चा झाल्याचे समजतेय. पुढील दोन दिवसांत जागावाटपाचा तिढा सुटेल अन् महायुतीची घोषणा होईल, असे समजतेय. (Maharashtra local body elections political alliance)

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असून यासाठी सलग बैठका सुरू आहेत. महायुतीतील जागा वाटपाबाबत सकारात्मक वातावरण असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी दिली. दोन्ही पक्षांमध्ये समन्वयाने चर्चा सुरू असून जागावाटपाबाबत सकारात्मक निर्णय होईल. येत्या दोन दिवसांत याबाबत ठोस निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे, असे आमदार मोरे यांनी सांगितले.

केडीएमसी निवडणुकीत महायुती एकत्र लढल्यास विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी आधीच संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू केली असून प्रभागनिहाय आढावा, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि रणनीती आखण्यावर भर दिला जात आहे. महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार असून, त्यानंतर प्रचाराला वेग येणार आहे. त्यामुळे केडीएमसी निवडणुकीत महायुतीची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आदित्य आणि राज ठाकरेंची भेट, नेमकी काय चर्चा झाली? VIDEO

बदलापुरात मोठा राडा; भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, कार्यालयही फोडलं, VIDEO

राजकारणातील मोठी घडामोड; शिंदे गटाची प्रकाश आंबेडकरांकडे मदतीसाठी हाक, नेमकं काय घडलं?

हातातला नायलॉन मांजा गळ्यापर्यंत! दोर पतंगाची कापायची की आयुष्याची?

डोंबिवलीत 'महायुती'त रक्ताचा सडा, पैसे वाटपावरून भाजप- शिंदेसेनेत राडा

SCROLL FOR NEXT